AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीखाली 200 वर्षापूर्वीचा खजिना… आर्मी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्याचं थेट पंतप्रधानांना पत्र

हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात 200 वर्षांपूर्वीचा खजिना दडल्याचा दावा आर्मी इंटेलिजन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याने केला आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पत्र पाठवून वैज्ञानिक पद्धतीने जमीन खोदण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्याप कार्यवाही झाली नाही, तरी या खजिन्याची चर्चा देशभर सुरू आहे.

जमिनीखाली 200 वर्षापूर्वीचा खजिना... आर्मी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्याचं थेट पंतप्रधानांना पत्र
TreasureImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 3:10 PM
Share

हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यतील कोटला खुर्द गावात जमिनीच्या खाली ऐतिहासिक वास्तू आणि कथित खजिना असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आर्मी इंटेलिजन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याने हा खजिना असल्याचा दावा केला असून तात्काळ जमीन खोदण्याचे आदेश देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष हिमाचल प्रदेशाकडे लागलं आहे. खरोखरच हिमाचल प्रदेशात खजिना आहे का? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

भारतीय लष्कराच्या इंटेलिजन्स विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी मनोज कुमार कौशल यांनी हा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांची एक टीम पाठवून वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करून जमीन खोदण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मनोज कुमार कौशल यांनी आज ऊना येथे पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. गावात सुमारे 200 वर्ष जुनी तोफ आणि खजिना जमिनीखाली दबलेला आहे, असा दावा मनोज कुमार यांनी केला आहे. 2016मध्ये एक ऐतिहासिक तोफ सापडली होती. त्याचा उल्लेख करून त्यांनी विद्यमान परिस्थितीवर भाष्य केलं होतं.

पंतप्रधान कार्यालयाला पत्र

सुमारे 200 वर्षापूर्वीचा हा खजिना आहे. सरकारने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. एक तज्ज्ञांची टीम पाठवून याचा तपास केला पाहिजे. जमीन खोदून हा खजिना बाहेर काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मी एक वर्षापूर्वी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं होतं. तिथून हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय आणि नंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून डीसी, एसडीएम तसेच एसपी कार्यालयापर्यंत गेलं आहे. प्रशासनाने एक अधिकारी तपासणीसाठी नियुक्तही केला होता. मात्र, त्याने हे प्रकरण उच्च पातळीवरील असल्याचं सांगून वरिष्ठांशी बोलण्यास सांगितलं. हा खजिना काढण्याचं आश्वासन मिळालं. पण प्रशासकीय दिरंगाईमुळे पुढे काहीच झालं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्या तोफेचं काय झालं?

जून 2016मध्ये पेरणी करत असताना एक मोठी तोफ सापडली होती. त्याचा हवाला देऊन ते म्हणले की, नांगराची टक्कर लागल्याने तोफ सापडली होती. 10 वर्षानंतरही ही तोफ सार्वजनिकरित्या कुठेच दिसत नाहीये. तसेच या तोफेचं काय झालं? याची माहितीही दिली जात नाही, असं त्यांनी म्हटलंय.

इंग्रजांच्या काळात काही तोफा आणि खजिना पिघळवल्यानंतर ते जमिनीत गाडण्यात आले होते. त्यामुळे सरकारने आधुनिक उपकरण आणि मेटल डिटेक्टरच्या मदतीने या परिसराचं सर्वेक्षण केलं पाहिजे. तसेच पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या देखरेखीत आवश्यक खोदकाम केलं पाहिजे. तसेच मिळणाऱ्या सर्व ऐतिहासिक वस्तू सरकारने आपल्या संरक्षणात ठेवल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण