AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : अरे नान्या काय करतोस, बाजूला हो…भर कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांच्यासोबत केलेलं असं काही की…अभिनेत्यानं सांगितला प्रसंग

Ashok Saraf On Nana Patekar : अशोक सराफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांचा किस्सा सांगितला आहे.

Nana Patekar : अरे नान्या काय करतोस, बाजूला हो...भर कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांच्यासोबत केलेलं असं काही की...अभिनेत्यानं सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 23, 2026 | 3:03 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीची चर्चा आजही होते. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील अनेक आठवणी आजही चाहत्यांसाठी खास आहेत. अशातच अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

अशोक सराफ यांनी सांगितलं की, नाना पाटेकर अनेकदा त्यांची पाठ दाबून द्यायचे. त्याबदल्यात अशोक सराफ त्यांना पाच रुपये द्यायचे. एकदा झीच्या एका कार्यक्रमासाठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार एकत्र आले होते. कार्यक्रम सुरू असतानाच नाना अचानक मागून आले आणि त्यांनी अशोक सराफ यांची पाठ दाबायला सुरुवात केली. अशोक सराफ म्हणाले की, ‘नाना माझी पाठ दाबायचा, त्याचे मी त्याला पाच रुपये द्यायचो.’

‘त्यानंतर एकदा झीचा कार्यक्रम होता. तिथे सगळेच आलेले, कार्यक्रम सुरू होता, नाना मध्येच मागून आला आणि त्याने माझी पाठ दाबायला सुरुवात केली. मी म्हटलं, ‘अरे नान्या काय करतोस हे, बाजूला हो…’ पण, तो काही ऐकला नाही. त्याने पाठ दाबली, माझं डोकं दाबलं, मी त्याला 10 रुपये दिले. त्यावर तो म्हणाला, ‘हे काय? आपले दोनच रुपये ठरलेले‘ मी म्हटलं, महागाई वाढलीये. त्याने ते पैसे खिशात ठेवले आणि गेला निघून. त्याच्याकडे खूप प्रामाणिकपणा होता.’ असं अशोक सराफ शेवटी म्हणाले. ‘एबीपी माझा‘ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ बोलत होते.

दरम्यान, नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झालं. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी गोव्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अंकुश’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण