AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव हादरलं; जमिनीच्या वादातून डॉक्टरसोबत भयानक कांड, मृतदेह थेट धरणात सापडला…

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत बांधून धरणात फेकण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलं असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.

जळगाव हादरलं; जमिनीच्या वादातून डॉक्टरसोबत भयानक कांड, मृतदेह थेट धरणात सापडला...
जळगावमध्ये डॉक्टरची हत्या Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 3:09 PM
Share

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेत जमिनीच्या व्यवहारातून डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. संजय तेली असं या हत्या झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. संजय तेली हे गोरडखेडा येथून 18  नोव्हेंबरपासून बेपत्ता होते.  त्यांची हत्या करून मृतदेह गोणीत बांधून बहुळा धरणार फेकण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.  1 कोटी 25 लाखांच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणात ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.  जमिनीचा व्यवहार घडवून आणणाऱ्या एजंटला कमिशन देण्याच्या बहाण्याने डॉक्टर संजय तेली यांना गोराडखेडा येथे बोलून घेण्यात आले होते, अशी माहिती देखील समरो येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आज सकाळी बहुळा धरणातून गोणीत बांधलेला त्यांचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आहे. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी एक कोटी 25 लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी डॉक्टर तेली गोरडखेडा येथे आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा येथे मिळाले होते. तसेच त्यांची कारही परिसरात आढळली होती. पोलिसांनी संशयावरून राहुल धर्मराज पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला संजय भील याने मदत केल्याचेही तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला जमिनीच्या व्यवहारापोटी 80 लाख रुपये दिले होते, अशी माहिती डॉक्टर तेली यांच्या कुटुंबीयांनी दिली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण