AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत पत्नीच्या ‘भूता’ने पाठवला OTP? मोबाईल पाहताच पतीलं भरलं कापरं, पोलिसांत जाताच..

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे, एक महिला अचानक तिच्या मुलासह गायब झाली. अस्वस्थ होऊन तिच्या पतीने त्यांचा खूप शोध घेतला, अगदी खुनाचा एफआयआरही दाखल केला. पण दोन वर्षांनंतर, एका ओटीपीने संपूर्ण कहाणी बदलली.

मृत पत्नीच्या ‘भूता’ने पाठवला OTP?  मोबाईल पाहताच पतीलं भरलं कापरं, पोलिसांत जाताच..
Image Credit source: AI Generated Photo
| Updated on: Feb 11, 2026 | 3:51 PM
Share

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेच्या पतीने तिच्या हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्या महिलेचा ठावठिकाणा शोधत होते. जर तिची हत्या झाली असेल तर किमान काही सुगावा लागेल अशी त्यांना आशा होती. पण दोन वर्ष उलटून गेली, तरी त्या महिलेचा काहीच पत्ता लागला नाही. पण, एके दिवशी, अशी अनपेक्षित घटना घडली ज्यामुळे सगळेच हादरले. पोलिसांपासून ते महिलेच्या पतीपर्यंत सर्वांनाच मोठां धक्का बसला. महिलेच्या पतीच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी आला, ज्याने ती महिला जिवंत असल्याचं धक्कादायक सत्य उघडलं.

ती महिला फक्त जिवंत सापडली नाही, तर तिने दुसऱ्या राज्यात जाऊन तिचं घर, संसार थाटला होता, हेही उघड झालं. हे संपूर्ण प्रकरण कप्तानगंज ठाणे क्षेत्रातील पिलखाव गावचं आहे. तिथे राहणाऱ्या प्रियांका नामक तरूणीचं ल्गन 14 मे 2018 साली संदीपशी झालं. लग्नानंतर सहा-सात वर्षं त्यांचं आयुष्य उत्तम सुरू होतं. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र त्यानंतर पती-पत्नीमध्ये अचानक वाद होऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2024 रोजी वाद इतका वाढला की प्रियांका तिचे दागिने घेऊन तिच्या पालकांच्या घरी गेली. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तिथून ती तिच्या मुलाला घेऊन अयोध्येला पोहोचली. शरयू नदीच्या किनारी ती जीव देणारच होती, पण तेवड्यात राजस्थानहून आलेल्या मंगलचंद्र याने तिला पाहिलं. त्याने प्रियांकाचा जीव वाचवला. नंतर तिनेही आत्महत्येचा विचार सोडून दिला. तिथून ती मंगलचंद्रसोबत राजस्थानला निघून गेली. ितिथे जाऊन ते दोघं पती-पत्नीप्रमाणे, लिव्ह-इनमध्ये राहू लागले.

न्यायालयाच्या आदेशावरून FIR

मात्र बस्ती येथे, पत्नी आणि मुलाच्या अचानक बेपत्ता होण्याने पती संदीप खूप खचला, सैरभैर झाला. त्याने त्यांचा खूप शोध घेतला, पण ते सापडलेच नाहीत. अखेर त्याला संशय आला की त्याच्या सासरच्या लोकांनी दागिन्यांच्या हव्यासापोटी प्रियंका आणि मुलाची हत्या केली असावी आणि त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिले असावेत. संदीपने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याचे ऐकण्यास नकार दिल्याने संदीप न्यायालयात गेला. न्यायालयाच्या आदेशानुसार, 4 नोव्हेंबर 2024 रोजी प्रियांकाचे आई-वडील, चुलत भाऊ आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

OTP ने पलटला सारा खेळ

यातच 2 वर्ष गेली. प्रियांका ही तिची ओळख बदलून राजस्थानमध्ये रहात होती. तिथे ती एका आधार सेंटवर जाऊन फोटो आणि पत्ता अपडेट करणापर होती. मात्र तिने जुना नंबर टाकताच, लिंक असलेल्या जुन्या नंबरवर ( जो आधी पती संदीपकडे होता) OTP गेला. संदीपने OTP पाहिल्यावर त्याला सगळा प्रकार क्षणात लक्षात आला आणि त्याने लगेच पोलिसांना कळवलं.

राजस्थानमधून प्रियांकाला घेतलं ताब्यात

इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सचा वापर करून पोलिसांनी राजस्थान गाठले आणि प्रियांकाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी प्रियांकाला बस्ती येथे आणले तेव्हा तिथले दृश्य पाहण्यासारखे होते. पत्नी आणि मुलाला पाहताच तो भावूक झाला, पण त्याला बायकोचा खूप राहगी आला होता. मला प्रियांकासोबत रहायचं नाही, मला फक्त माझा मुलगा सोबत हवा आहे, असंही तो म्हणाला. पण त्याच्या मुलाने संदीपसोबत राहण्यास नकतार दिला, तो तर त्याला आपले वडील मानण्यासही तयार नव्हता.

मुलाच्या ताब्यासाठी कारवाई

“न्यायालयाच्या आदेशावरून हत्येचा एफआयआर दाखल करण्यात आला. सदर महिला जिवंत आढळल्यानंतर तिचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला. मुलाच्या ताब्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जात आहे. लवकरच अंतिम अहवाल दाखल केला जाईल ” असं एएसपी श्यामकांत म्हणाले.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!