AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : गोपीनाथ मुंडेंच नाव मुख्यमंत्री पदासाठी दिलं असतं, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंकडून सडेतोड प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule : माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक त्रुटींचा सामना करावा लागतोय. खिडक्यांना जाळ्या नाहीत, स्वच्छतागृहांना लाईट नाही. काहींना दरवाजे नाहीत.

Chandrashekhar Bawankule : गोपीनाथ मुंडेंच नाव मुख्यमंत्री पदासाठी दिलं असतं, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंकडून सडेतोड प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule
| Updated on: Aug 17, 2026 | 8:15 AM
Share

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो, त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी दिलं असतं, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यावर भाजप नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काही काम नाही. मीडियात चर्चेत राहण्यासाठी ते बोलतात. काँग्रेसच्या किती लोकांनी, किती लोकांचा जीव घेतला हे त्यांनी तपासलं पाहिजे. गोपीनाथ मुंडे आमचे नेते होते. भाजपने नेहमीच सर्वोच्च स्थानावर त्यांचा मान ठेवला आहे. जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतो. अशा घटनांना गालबोट लावणं, त्यावर भाष्य करणं, मृत व्यक्ती जिवंत नसताना त्यांच्याबद्दल मीडियाच्या माध्यमातून अशी भूमिका मांडणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी हे समजून घेतलं पाहिजे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक त्रुटींचा सामना करावा लागतोय. खिडक्यांना जाळ्या नाहीत, स्वच्छतागृहांना लाईट नाही. काहींना दरवाजे नाहीत. चिंधुजी पुरके आदिवासी आश्रम शाळा मारेगाव येथे पुरेशी सुविधा नाही. या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “वसंतराव पुरके भाजपविरोधात बोलतात म्हणून नाही, तर आदिवासी आश्रम शाळेत मुला-मुलींच्या शौचालयाला दरवाजे नसतील तर ती अवहेलना आहे. पुन्हा तपासणी करु, त्या विभागाचे जे सचिव आहेत, विजय वाघमारे यांच्याशी मी बोलेन”

माझ्यावर काय जबाबदारी आहे, हे आज मला कळेल

“आज मी राजस्थानच्या प्रवासात आहे. जयपूरला बैठक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या तिथे निवडणुका आहेत. सहप्रभारी राजस्थान म्हणून माझ्यावर काय जबाबदारी आहे, हे आज मला कळेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सर प्रक्रियेवर रोहित पवार टीका करतायत. त्यावर बावनकुळे म्हणाले की, “खरंतर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेविरुद्ध बोलणं हे संविधान विरोधी वक्तव्य आहे. रोहित पवारांनी हे तपासलं पाहिजे, सर्वांना संधी आहे. सर्व पक्षाच्या बूथ लेव्हल एजंट यांना सोबत काम करायचं आहे. तुमचे पण बूथ लेव्हल एजंट आहेत ना, मग ते काय काम करतायत. खोटारडेपणा सोडला पाहिजे. सर्वांनी प्रामाणिकपणे मदत केली पाहिजे. एकही मतदार सुटणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रोहित पवार नकारात्मक वातावरण तयार करतायत”

Follow Us