AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असिस्टंट पदावरील महिलेला रात्री दर्ग्यात बोलावलं, तिचे केस सोडले, नंतर… मौलवीचं नको ते कृत्य

रात्री महिलेला दर्ग्यात बोलावलं, नको त्या ठिकाणी हात लावला त्यानंतर तर..., उपचाराच्या नावाखाली भिवंडीत मौलवीचं घाणेरडं कृत्य समोर आलं आहे. पोलिसांनी मौलवीला अटक केली असून तपास सुरु केला आहे.

असिस्टंट पदावरील महिलेला रात्री दर्ग्यात बोलावलं, तिचे केस सोडले, नंतर... मौलवीचं नको ते कृत्य
| Updated on: Aug 17, 2026 | 8:17 AM
Share

कोणता आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर देखील प्रकृती सुधारली नाही तर, अनेक जण तंत्र – मंत्र करण्यावर विश्वास ठेवतात. तंत्र – मंत्र करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. आता देखील असंच काही झालं आहे. आजार बरा देण्याच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची भयानक घटना समोर येत आहे. एका मौलवीने महिलेला तुझा आजार बरा करून देतो सांगितलं आणि तिच्यावर अत्याचार केलं. भिंवडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भिवंडी येथील वऱ्हाळ देवी परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्ग्यातील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्यावर महिलेने गंभीर आरोप केले आहेत. महिलेने पोलिस स्थानकात तक्रार दाखल करताच, पोलिसांनी मोठी कारवाई करत 50 वर्षीय मौलवीला भायखाळा रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिला काही आजार असल्याने घरच्यांनी तिला मौलवीकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिला उपचारासाठी मौलवीकडे आली. पण त्याठिकाणी तिच्यासोबत काही वाईट होणार आहे, याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं.

2024 मध्ये महिला मौलवीला भेटली. त्यानंतर मौलवीने तिला दर्ग्यात बोलावलं. तेव्हा तिला विविध विधी करण्यास सांगितलं. या दरम्यान महिलेचे बांधलेले केस सोडून लिंबू कापणे आणि इतर अघोरी प्रकार केल्याचं तक्रारीत नमूद केलं. एवढंच नाही तर, उपचाराच्या नावाखाली मौलवी महिलेच्या गुप्तांगाला देखील हात लावत असताना महिलेने विरोध केला. पण हा विधीचा एक भाग आहे आणि करावाच लागेल… त्यानंतर तिला उपाचारासाठी दर्ग्यात बोलावलं आणि बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले.

मौलवी येथेच थांबला नाही. त्याने शरीरिक संबंधांचे व्हिडीओ शूट केले आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचं बाबाने तिला फोन केला. व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजल्यानंतर महिला घाबरली आणि तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. हा प्रकार काही दिवस सुरुच होता, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचं कळताच मौलवीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशला पळून जाण्याचा त्याचा डाव होता. पण पोलिसांनी त्याला भायखाळा रेल्वे स्थानक येथून अटक केली. आता व्हिडीओ कोणी तयार केला? कोणी आणि कसा व्हायरल केला? याबद्दल पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Follow Us