AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजणांना व नातेवाईकांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

श्रावण पंचमीला नागपंचमीचा सण मोठ्या आनंदाने सर्वत्र साजरा करण्यात येतो. तर नागपंचमीच्या या खास सणानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजणांना तसेच नातेवाईकांना या खास शुभेच्छा पाठवून हा सण खास बनवूयात.

नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजणांना व नातेवाईकांना पाठवा 'या' खास शुभेच्छा
Nag Panchami Wishes
| Edited By: | Updated on: Aug 17, 2026 | 8:17 AM
Share

श्रावण महिना सुरू होताच एकामागून एक सण येत असतात. कारण हा महिनाच सणउत्सवांचा तसेच महादेवाच्या खास भक्तीचा असतो. दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्याच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. तर आज 17 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेव आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने कालसर्प दोष आणि भीती यांच्या वाईट प्रभावांपासून मुक्ती मिळते. तर आजच्या दिवशी नागपंचमीला शिव आणि साध्य योगाचा एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे. असे मानले जाते की या योगादरम्यान केलेल्या कर्मांचे फळ शुभ असते. चला तर मग आपल्या प्रियजणांना व नातेवाईकांना या नागपंचमीचे शुभेच्छा संदेश, मेसेज पाठवून हा सण खास पद्धतीने साजरा करूयात.

नागपंचमी निमित्त आपल्या खास लोकांना पाठवा या शुभेच्छा

1. मुखाने ॐ नमः शिवाय म्हणा, नागदेवतेचे स्मरण करा, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

2. वारूळा जाऊया, नागोबाला पुजूया, नागपंचमीच्या सणाला गोड गोड खाऊया! नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

3. वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभदिनी सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. रक्षण करूया नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

5. महादेवांच्या चरणी केलेली भक्ती स्वीकारली जावो, नागदेवतेच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे सदैव रक्षण होवो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

6. श्रावणात कोकिळ गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभदिनी सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

7.ॐ नमः शिवाय! नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा!

8. नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर नागदेवतांची सदैव कृपा असू दे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

9. भगवान शिवांच्या कृपेने आणि नागदेवतेच्या आशीर्वादाने, आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. हर हर महादेव! ॐ नमः शिवाय! नागपंचमी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

10. नागपंचमीचा खास सण आणि श्रावणी सोमवारचा हा पवित्र दिवस, आपल्या जीवनात मंगल घेऊन येवो. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!