AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कॅफेमध्ये रिलस्टारने केले तरुणावर सपासप वार, पोलिसांनी घडवली अद्दल

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिलस्टारने तरुणावर हल्ला केला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे.

पुण्यातील कॅफेमध्ये रिलस्टारने केले तरुणावर सपासप वार, पोलिसांनी घडवली अद्दल
PuneImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 17, 2026 | 8:22 AM
Share

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे. पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात मध्यरात्री झालेल्या एका हिंसक हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १५ ऑगस्टच्या पहाटे ‘फ्लाइंग जिप्सी’ हॉटेलसमोर एका १९ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रसिद्ध रीलस्टार तरुणीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे नाव अथर्व प्रमोद जगताप (वय १९, रा. आंबेगाव) आहे. शनिवारी पहाटे सव्वातीन वाजता अथर्व शिरोळे हॉटेलमधून बाहेर पडत असताना आरोपींनी त्याला अडवले. जुन्या वादाचा राग मनात बाळगून त्यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. घाबरलेला अथर्व जीव वाचवण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत पळाला, पण आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हॉटेलमधील खुर्ची त्याच्यावर फेकली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या घटनेनंतर जखमी अथर्वने थेट डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरुणींसह एकूण तिघांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये प्रसिद्ध रीलस्टार माधवी कुंभार ( रा. हडपसर ), स्नेहल सोनके ( रा. पिंपळे गुरव ) आणि शार्दुल ओव्हाळ ( रा. हडपसर ) यांचा समावेश आहे. या तिघांशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या इतर ७ ते ८ जणांवरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधीपासून ओळख असूनही हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अथर्व जगताप आणि आरोपी तरुणींची (माधवी, स्नेहल) आधीपासून ओळख होती. काही महिन्यांपूर्वी सातारा येथे त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याच जुन्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी पुणे शहरात हा जीवघेणा हल्ला केला. या हॉटेल आणि परिसरात सातत्याने होणाऱ्या गोंधळ व मारहाणीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकही त्रस्त झाले आहेत. आता या प्रकरणी आणखी काही नवी माहिती मिळते का? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप