AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजपाल यादव तुरुंगात जाणार, 2 महिन्यांपूर्वीच प्रेमानंद महाराजांना समजलं होतं? म्हणाले “हार मानू नकोस..”

अभिनेता राजपाल यादव गेल्या काही वर्षांपासून चेक बाऊन्स प्रकरणात अडकला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांच्यात जो संवाद झाला, त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

राजपाल यादव तुरुंगात जाणार, 2 महिन्यांपूर्वीच प्रेमानंद महाराजांना समजलं होतं? म्हणाले हार मानू नकोस..
प्रेमानंद महाराज आणि राजपाल यादवImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 12:35 PM
Share

अभिनेता राजपाल यादव काही वर्षांपूर्वीच्या चेक बाऊन्स प्रकरणात आता तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडू न शकल्याने त्याला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. या कठीण काळात आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजण त्याची आर्थिक मदत करत आहेत. यादरम्यान आता राजपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी तो वृंदावनला गेला होता. तिथे त्याने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहे की, कदाचित प्रेमानंद महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाची कुणकुण आधीच लागली होती. म्हणूनच ते त्याला खंबीर राहून आव्हानांचा सामना करण्याचा सल्ला देत होते. या भेटीदरम्यान राजपाल भावूक झाला होता.

प्रेमानंद महाराज यांचा राजपालला सल्ला

या भेटीदरम्यान राजपालने महाराजांसमोर कॉमेडीची एक झलकसुद्धा दाखवली होती. त्यावर ते खळखळून हसले. पुढे त्याला सल्ला देत ते म्हणाले, “आपलं चित्तं देवाशी जोडून ठेवणं हे आयुष्यात सर्वांत गरजेचं आहे. कारण आयुष्यात दु:ख, संकटं येतच असतात. कधीकधी आपल्या जवळच्या लोकांपासून आपण दूर जातो. अशा परिस्थितीत आयुष्य कठीण वाटू लागतं. आर्थिक समस्या, व्यवहार अशा अनेक समस्या आहेत. त्या संकटकाळात फक्त देवच आपल्याला सावरू शकतो. एखादा माणूस तुझ्याशी आज हात मिळवेल, परंतु जेव्हा तू एखाद्या अडचणीत सापडशील, तेव्हा तो बाजूला होईल. संकटकाळात फक्त देवच साथ देतो. त्यामुळे देवाचा नाम जप कर. प्रत्येक संकट, दु:ख यांच्याशी लढायला शिक, हार मानू नकोस.”

“प्रत्येक समस्येदरम्यान धीट राहा, खंबीर राहा. खचू नकोस. देवाचं नामस्मरण करत राहा. देव खूप शक्ती आणि सहयोग देतो. आपण देवाला विसरलोय, म्हणून आज पश्चात्ताप करत आहोत”, असा उपदेश ते राजपालला देत असतात. हे सर्व ऐकताना तो भावूक होतो. पुढच्या वेळी पत्नीला सोबत घेऊन दर्शनाला येणार असल्याचं तो त्यांना सांगतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेमानंद महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाबद्दल दोन महिने आधीच समजलं होतं, असं अनेकांनी म्हटलंय.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला