भारतात कोठे मिळते सोने स्वस्त ? 22K आणि 24K कॅरेट सोने कोणत्या राज्यात स्वस्त मिळते ?
गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशात कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त सोने मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या...

गेल्या एका महिन्यांपासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्यांच्या किंमतीत २२००० रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणारे देखील आता पुढे येत आहेत. भारतात प्रत्येक राज्यात सोन्याचे दर मात्र वेगवेगळे असतात. प्रत्येक राज्यात सोन्याच्या किंमतीवर VAT वेगवेगळा असतो. त्यामुळे सोन्याचे दर देखील वेगळे असतात. चला तर पाहूयात भारतात कोणत्या राज्यात सोने स्वस्तात मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना या राज्यात जाऊ सोने खरेदी करणे सोपे जाईल.
कोणत्या राज्यात सोने स्वस्त ?
सोन्याच्या किंमती निश्चित करण्याचा मानक वेगवेगळे असतात. प्रत्येक राज्यात सोन्याच्या किंमती त्यामुळे वेगवेगळ्या आहेत. मात्र, केरळात नेहमीच सोने स्वस्त मिळणाऱ्या राज्यात गणले जाते.
याचा अर्थ असा नाही की केरळात प्रत्येक जागी सोने अन्य राज्याच्या तुलनेत स्वस्त मिळेलच असे नाही. सोन्याच्या किंमती सोबत मेकिंग चार्ज आणि इतर खर्चाचा देखील तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकेल.
केरळात का मिळते सोने सर्वात स्वस्त ?
वास्तविक केरळात लोकांच्या दरम्यान सोने खरेदी करण्याची प्रवृत्ती खूपच जुनी आहे. येथे लग्नात आणि सणाच्या दरम्यान सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. याशिवाय राज्यात ज्वेलर्सच्या दुकानांची संख्या देखील जास्त आहेत. आपल्या दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथे मोठी स्पर्धा असते. याचा फायदा खरेदीदारांना चांगली किंमत आणि मेकिंग चार्जच्या रुपात मिळू शकते.
अन्य राज्यात काय स्थिती
केरळशिवाय तामिळनाडू आणि महाराष्ट्रात देखील सोन्याची खरेदीसाठीचे चांगले बाजार आहेत. केरळाच्या कोच्चीत सोन्याचा मोठा व्यवसाय आणि ज्वेलर्स दरम्याने मोठी प्रतिस्पर्धा असते. तामिळनाडूच्या चेन्नईत देखील सोने आणि चांदीचा ज्वेलरीचा मजबूत बाजार आहे. तर मुंबईतही बुलियन आणि ज्वेलरीचा मोठा व्यवसाय आहे. अशा या राज्यात देखील खरेदीदारांना चांगले दर मिळू शकतात. त्यामुळे यामुळे कायमस्वरुपी स्वस्त सोने विकणारे असे एक राज्य देशात नाही.
