AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप, ९ फेब्रुवारीला रिक्षाची चावी देणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

पुढील वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी पात्र शेतकऱ्यांना रिक्षाची चावी देण्यात येणार आहे, अशीही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप, ९ फेब्रुवारीला रिक्षाची चावी देणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा
Auto Rickshaw Permit for drought-affected farmers
| Updated on: Nov 26, 2026 | 11:06 PM
Share

शेतीचा बिनभरवशाचा व्यवहार आणि पावसाची अनिश्चिततेचा फटका शेतकऱ्यांना कमी बसावा आणि शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत (२०२७ ते २०३१) ‘अनाथांचा नाथ.. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या योजनेंतर्गत तब्बल १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

राज्यातील ३०८ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचा परिवहन विभागाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरवर्षी २० हजार याप्रमाणे पाच वर्षांत एक लाख शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रिक्षासाठी १० टक्के अनुदान आणि ९० टक्के कर्ज मिळणार असून, शेतकऱ्यांना केवळ ८०० रुपयांची सदस्यत्व पावती काढावी लागणार आहे. ही महत्वाकांक्षी ‘ अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ ९ फेब्रुवारीपासून राज्यात लागू होणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालत कल्याणकारी मंडळामार्फत ‘अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ राबविण्याचा येणार आहे.

अनाथांचा नाथ.. दुष्काळाग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाताला मिळणार रोजगाराचे नवे साधन मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत १ लाख रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून दिलासा मिळणार आहे. यासाठी ९० टक्के बँक कर्ज, तर १० टक्के आर्थिक मदत कल्याणकारी मंडळाकडून मिळणार असल्याचेही माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला