AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : 317 रन करूनही भारताचा पराभव, श्रीलंकेने आशिया कपमधून बाहेर केलं!

India A vs Sri Lanka A : आशिया कप राइजिंग स्टार्स 2026 मधील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली, पण विजय मिळवण्यात अपयश आले.

IND vs SL : 317 रन करूनही भारताचा पराभव, श्रीलंकेने आशिया कपमधून बाहेर केलं!
IND vs SLImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 11:08 PM
Share

आशिया कप राइजिंग स्टार्स 2026 मध्ये भारतीय संघाचं आव्हान संपलं आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये श्रीलंका A ने इंडिया A चा एकतर्फी पराभव केला. भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करत 317 रनचा मोठा स्कोअर उभा केला होता. त्यामुळे श्रीलंकेसमोर विजयासाठी 318 रनचं लक्ष्य होतं. मात्र, भारतीय बॉलर्सना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत अवघ्या 41.3 ओव्हरमध्येच विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने फायनलमध्ये प्रवेश केला, तर तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपलं.

317 रन करूनही भारतीय संघाचा पराभव

पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने प्रथम बॅटिंग करत 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 317 रन केले. मोठी धावसंख्या उभारल्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 318 रनचं लक्ष्य ठेवलं. सेमीफायनलचा सामना असल्याने भारतीय बॉलर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

श्रीलंकेने 41.3 ओव्हरमध्येच जिंकला सामना

318 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकाेच्या फलंदाजांनी शानदार खेळ केला. त्यांनी भारतीय बॉलर्सना विकेट्स मिळवण्याची संधीच दिली नाही. श्रीलंकेने अवघ्या 41.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 318 रनचा टप्पा गाठला. म्हणजेच त्यांनी 8.3 ओव्हर शिल्लक असतानाच सामना जिंकला.

भारताचं स्पर्धेतील आव्हान संपलं

या पराभवामुळे तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया संघाचं आशिया कप राइजिंग स्टार्स 2026 मधील आव्हान संपलं आहे. दुसरीकडे, श्रीलंका-A संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने 317 रनची मोठी धावसंख्या उभारूनही बॉलर्सना विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे या पराभवाची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.

अभिषेक, तिलक आणि शाहबाजची अर्धशतके

टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या भारताला वैभव सूर्यवंशीने 27 बॉलमध्ये 40 रन करून चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने 78 रन, तर कर्णधार तिलक वर्माने 53 रन केले. लोअर ऑर्डरमध्ये शाहबाज अहमदने नाबाद 54 रनची खेळी केली. त्याने तनुष कोटियनसोबत 7व्या विकेटसाठी 73 रनची भागीदारी केली. त्यामुळे भारताला 317 रनपर्यंत मजल मारता आली.

श्रीलंकेच्या दोन फलंदाजांची शतके

318 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी भारतीय बॉलर्सची धुलाई केली. लसिथ क्रुसपुले आणि सिनेथ जयवर्धने यांनी पहिल्या विकेटसाठी 174 रनची भागीदारी केली. जयवर्धनेने 70 बॉलमध्ये 105 रन, तर क्रुसपुलेने 107 बॉलमध्ये 116 रन ठोकले. दोघांनी शतके झळकावत भारताच्या हातातून सामना जवळपास काढून घेतला.

यानंतर निशान मदुष्काने नाबाद 58 रन आणि कर्णधार पवन रत्नायकेने नाबाद 31 रन केले. श्रीलंकेने 41.3 ओव्हरमध्येच विजय मिळवला. अशा प्रकारे 51 बॉल शिल्लक असतानाच श्रीलंकेने फायनलमध्ये धडक मारली.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला