Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
गणेशोत्सवात गेले अकरा दिवस मनोभावे पूजा, सेवा केल्यानंतर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. तब्बल २० तासांहून अधिक चाललेल्या मिरवणुकीनंतर मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा विसर्जनासाठी दाखल झाला. राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी भाविक, भक्तांनी अलोट गर्दी केली होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही जल्लोषात नव्या उत्साहात विघ्नहर्ता गणरायाचं घराघरात, सार्वजिनक गणेशोत्सव मंडळात वाजत-गाजत आगमन केलं. मुंबईतील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी राज्यातील देशातील भाविक मुंबई आणि पुण्यात दाखल झाले होते. यादरम्यान, वरूण राजाने जोरदार हजेरी लावली असतानाही भाविकांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. अशातच मुंबईच्या लालबाग परिसरातील लालबागचा राजा याच्या दर्शनासाठी भाविकांनी गणेशोत्सवात मोठी गर्दी केली होती. गेले दहा ते अकरा दिवस मनोभावे पूजा, अर्चना आणि सेवा केल्यानंतर लालबागच्या राजाच्या महाआरती कऱण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तब्बल २० हून अधिक तासांनंतर लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लालबागच्या राजाच्या विजय असो, ही शान कोणाची… लालबागच्या राजाची असा एकच जयघोष भक्तांनी केला. तर पुढच्या वर्षी लवकर या असेही म्हणत आम्ही आतुरतेने पुढच्या वर्षी वाट पाहत आहोत, अशी साद बाप्पाला घालण्यात आली. तब्बल २५ तासानंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं.
Published on: Sep 18, 2024 11:02 AM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
