जागतिक विकासाला भारताचा हातभार; युकेचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन; दिल्लीत TV9 च्या ग्लोबल समिटमध्ये बरुण दास यांच्याशी संवाद

| Updated on: Jun 19, 2022 | 11:15 AM

टीव्ही 9 ग्रुपचे सीईओ बरुण दास यांच्याबरोबर कॅमेरॉन यांनी वेगवेगळ्या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी महत्वाच्या प्रश्नावरही चर्चा केली त्यामध्ये खरी चर्चा झाली रशियाच्या प्रमुखांबाबत. माजी पंतप्रधानांनी राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांना लोकांची सामुहिक कत्तल करणारा तो हत्तारा आहे असंही म्हटले आहे.

जागतिक विकासाला भारताचा हातभार; युकेचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन; दिल्लीत TV9 च्या ग्लोबल समिटमध्ये बरुण दास यांच्याशी संवाद
Follow us on

नवी दिल्लीः आगामी काळ हा भारताचा (India) असू शकतो, कारण हा देश जागतिक विकासाला हातभार लावणारी अर्थव्यवस्था ही भारताची असल्यानेच येणारा काळ हा भारताचा आहे असं मत शनिवारी युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन (Former Prime Minister of the United Kingdom David Cameron) यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित TV9 नेटवर्कच्या (TV9 Network) जागतिक शिखर परिषदेच्या What India Thinks Today या कार्यक्रमादरम्यान TV9 ग्रुपचे सीईओ बरुण दास (Barun Das) यांच्याशी बोलत असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमप्रसंगी कॅमेरॉन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारतात मौलिक पर्यायी बदल झाला आहे.

भारतात झालेल्या सुधारणा;’संरचणात्मकतेच्या

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतात झालेल्या सुधारणा या संरचणात्मकतेच्या झाल्या आहेत. जीएसटी, डिजिटल ओळख, उत्तम पेमेंट प्रणाली आणि महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे भारतात प्रत्यक्षात बदल घडवून आणण्यास त्यांच्यामुळे शक्य झाले आहे, आणि त्याचेच प्रतिबिंब भारतात सर्वत्र दिसत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकशाही नांदणारा मोठा देश

या कार्यक्रमप्रसंगी यूकेचे माजी पंतप्रधान यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचे कार्य हे मूलभूत पायाभूत सुविधांमुळेच त्यांचे काम दिसून येते. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, ‘भारत हा सर्वात मोठा लोकशाही नांदणारा देश आहे, ज्याप्रकारे भारत आहे त्याच प्रकारे ब्रिटन हा सुद्धा एक ऐतिहासिक देश आहे. त्यामुळे लोकशाहीची ताकद आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. यूकेमध्ये बहु-सांस्कृतिक समाज व्यवस्था आहे.

लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य

लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य आणि अल्पसंख्याकांना त्यांना त्यांचे मिळवून देणारे हक्क म्हणजे लोकशाहीचे राज्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. लोकशाही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता ज्या देशात लोकशाही नांदत नाही त्या देशांसाठी भारताने आणि ब्रिटनने काम केले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले.

मागास राहिलेल्या व्यक्ती, समाजः मुख्य प्रवाहात

कॅमेरॉन यांनी या कार्यक्रमात मत व्यक्त करताना सांगितले की, केवळ लोकवादी तत्वच फक्त समस्या सोडवतात असं नाही, तर त्यामुळे तर कधी कधी लोकांच्या भावना आणि लोकांची मनं भडकावण्याचीही कामं केली जातात. जागतिकीकरणाने अनेक लोकांना गरीबीतून बाहेर काढले असले तरी काही लोकं मात्र या सगळ्या विकासापासून लांब आणि मागे राहिली आहेत. विकसनशील देशांनी एक ध्यानात ठेवले पाहिजे की, मागास राहिलेल्या व्यक्ती, समाज त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

‘भारत’ स्थायी सदस्य होण्यास नक्कीच पात्र

या परिषदेत कॅमेरून यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास नक्कीच पात्र आहे. भारत, ब्रिटनसारखे देश प्रगती करत असले तरी काही देशांना सुधारणा नको आहेत कारण त्यांना यथस्थिती कायम ठेवायची आहे.

सामुहिक कत्तली करणारा मारेकरी

बरुण दास यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान कॅमेरून यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली स्पष्ट मतं व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांना हात घालत त्यांनी रशियावरही महत्वाची टिप्पणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांनी सामुहिक कत्तली करणारा मारेकरी असंही म्हटलं आहे. युक्रेनमध्ये जी युद्धमय परिस्थिती झाली त्या परिस्थितीला राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निष्पाप लोकांचा बळी

रशियाने नेहमीच युक्रेनवर हल्ला करुन निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. तरीही आजही रशियाकडून बॉम्बहल्ला सुरूच ठेवण्यात आला.युक्रेनवर सतत रशियाकडून हल्ले केले जात आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी युक्रेनच्या बाजूने उभा राहिले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पुतिन कितीतरी धोकादायक

कार्यक्रमात सवाल जवाब असा प्रकार नसला तरी यावेळी बरूण दास यांनी त्यांना विचारले की, पंतप्रधान असताना पुतिन यांच्यासोबत कामकाजाचे संबंध कसे प्रस्थापित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान म्हणून कामकाजाचे नाते निर्माण करणे हे तुमचे काम आहे. मात्र तरीही आज पुतिन कितीतरी जास्त धोकादायक, तर्कहीन आणि आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडे लोकशाही मूल्यांच्या विरोधात काम करणाऱ्या शक्ती असच पाहिले जाते. पुतिन संपूर्ण युक्रेनवर हल्ला करणार नाहीत, असे पाश्चात्य देशांना वाटत होते, पण त्यांनी आपली अतार्किकता दाखवून ते किती धोकादायक आहेत हे स्पष्ट केले. त्यामुळे आम्ही पुतीन यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू देणारच नाही असंही त्यांनी सांगितले.

 भारतीय वंशाचे तीन कॅबिनेट मंत्री

भारत आणि ब्रिटनमधील संबंधांबाबत कॅमेरून यांचा दृष्टिकोन हा या चर्चेदरम्यानचा एक प्रमुख मुद्दा होता. यावेळी ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे तीन कॅबिनेट मंत्री असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी भारतात लोकांना रेंज रोव्हर्स आणि जग्वार्स चालवताना पाहतो तेव्हा मला आनंद होतो. हे भारतीय कंपन्यांच्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले ब्रिटीश ब्रँड आहेत असंही त्यांनी मत व्यक्त केले.

लोकशाही देशांची मदत

सध्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी विकसनशील देशांना पूर्वीपेक्षा कमी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कॅमेरॉन यांचे मत होते की या हालचालीमुळे चीन ही पोकळी भरून काढत आहे. आपण गरीब देशांना मदत केली पाहिजे. त्यांनी लोकशाही देशांची मदत घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितले.

नवीन गोष्टी पाहायला आवडता

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याविषयी बोलताना कॅमेरॉन यांनी त्यांच्याविषयी गौरवौद्गगार काढताना म्हणाले की, राणी एलिझाबेथ म्हणजे त्या जगातील सर्वात महान सार्वजनिक सेवक आहेत. त्यांना भेटणे, त्यांच्याबरोबर चर्चा करणे म्हणजे अनोखा अनुभव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांना राजकारणाविषयी विचारताना सक्रिय राजकारणात परत येण्याच्या शक्यतेबद्दल काय सांगाल असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्या प्रश्नाला त्यांनी दूर ठेवत सांगितले की, युकेमधील लोकांना नवीन गोष्टी पाहायला आवडतात, जुन्या नाही असं म्हणत त्यांनी राजकारणातील पुनरागमनच्या प्रश्नांवर पडदा टाकला.