China Accident : बस उलटून मोठी जीवितहानी! तब्बल 27 जण ठार, 20 जखमी, चीनच्या एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

| Updated on: Sep 18, 2022 | 12:22 PM

चीनमध्ये या वर्षी झालेला हा सगळ्यात मोठा अपघात असल्याची माहिती, तब्बल 27 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही दाट भीती

China Accident : बस उलटून मोठी जीवितहानी! तब्बल 27 जण ठार, 20 जखमी, चीनच्या एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
भीषण अपघातानंतर रुग्णवाहिकांची लागलेली रांग
Image Credit source: Twitter
Follow us on

चीन : आंतरराष्ट्रीय जगतातून एक मोठी बातमी समोर येते आहे. एका भीषण बस अपघातामध्ये तब्बल 27 जणांनी प्राण गमावला आहे. चीनमध्ये (China Bus accident) घडलेल्या या अपघाताने प्रचंड जीवितहानी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक प्रवासी बस उलटली आणि बसमधील 27 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. चीनच्या (China News) दक्षिण-पश्चिम भागातील एका एक्स्प्रेस हायवेवर (Express Highway) हा भीषण अपघात घडला.

या अपघातानंतर आता स्थानिक पोलीस आणि बचाव यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली आहे. पुढील कारवाई केली जाते आहे. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यासाठी रुग्णवाहिकांची मदत घेण्यात येतेय. या अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळतेय.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 27 जणांचा एकाच वेळी बस अपघातात मृत्यू झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याचाही आता तपास केला जातो आहे. 2022 या वर्षात चीनमध्ये झालेला आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात असल्याचं एएफपी या वृत्त संस्थेन म्हटलंय.

दोन दिवसांतली दुसरी दुर्घटना

दोन दिवसांपूर्वीच चीनच्या शांघायमध्ये एका गगनचुंबी इमारतील आग लागली होती. या इमारतीच्या वरच्या मजल्यांना आगीने आपल्या कवेत घेतलं होतं. इमारतीच्या आगीचं दृश्य थरकाप उडवणारं असल्याचे व्हिडीओही समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता चीनमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं.

मध्य चीनमध्ये चांगला टेलिकॉमची ही इमारत होती. या इमारतीला लागलेल्या आगीत अनेक जण जिवंत जळाले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, मृतांचा आकडा किती होती, याची माहिती मिळू शकली नव्हती. दरम्यान, मोठं आर्थिक नुकसान या आगीमध्ये झालं होतं. अनेक कार्यालयं आगीत जळून खाक झाली होती. या आगमुळे एकच खळबळ उडालेली होती.