व्हेंटिलेटर न मिळाल्यानं 17 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू! राज्यात नेमकी कुठं घडली ही हृदयद्रावक घटना? जाणून घ्या

Yavatmal Ventilator death : वैष्णवी 17 वर्षांची तरुणी अस्वस्थ होती. तिच्यावर यवतमाळमध्ये उपचार सुरु होते. 14 तारखेच्या रात्री तिला यवतमाळमधून नागपुरात आणण्यात आलं होतं. तिला पोटाचा विकार होता. ती वेदनेने विव्हळत होती.

व्हेंटिलेटर न मिळाल्यानं 17 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू! राज्यात नेमकी कुठं घडली ही हृदयद्रावक घटना? जाणून घ्या
तरुणीचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 2:33 PM

यवतमाळ : 17 वर्षांची वैष्णवी. यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून तिला उपचारासाठी नागपुरात (Nagpur death) आणलं. वैष्णवीची मृत्यूशी झु्ंज सुरु होती. प्रकृती खालावत गेली. तातडीनं तिला व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. 24 तास ते व्हेटिंलेटर मिळावा म्हणून संघर्ष करत राहिले. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड थांबली नाही. पण तोपर्यंत वैष्णवीचे श्वास थांबले आणि वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्यानं आईवडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गमावलं. 17 वर्षांच्या वैष्णवीचा आईवडिलांसमोरच तडफडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. इतकंच नव्हे तर या घटनेनं आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित केला जातोय.

तडफडून मृत्यू!

वैष्णवी 17 वर्षांची तरुणी अस्वस्थ होती. तिच्यावर यवतमाळमध्ये उपचार सुरु होते. 14 तारखेच्या रात्री तिला यवतमाळमधून नागपुरात आणण्यात आलं होतं. तिला पोटाचा विकार होता. ती वेदनेने विव्हळत होती. प्रकृती अधिक खालावत चालली होती म्हणून डॉक्टरांनी वैष्णवीला नागपूरच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे तिला नागपुरात तिचे आईवडील घेऊन आले. पण नागपूरच्या मेडिकल कॉलेजात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते.

व्हेंटिलेटवर नसल्यामुळे या तरुणीला डॉक्टरांनी एब्यु बॅग देण्यात आली होती. एम्ब्यु बॅग म्हणजे एक प्रकारचा कुत्रिम फुगा असतो, जो दाबल्याने श्वास घेण्याच्या प्रकियेत रुग्णाला मदत होते. ही ऍम्ब्युबॅग वैष्णवीच्या आईवडिलांना दाबावी लागत होती. वैष्णवीला जिवंत ठेवण्यासाठी व्हेंटिलेटर न मिळाल्यानंतर डॉक्टरांनी ऍब्म्यु बॅगचा वापर केला होता.

हे सुद्धा वाचा

LIVE Video : ताज्या घडामोडी

पुढचे 20 तास वैष्णवीचे आईवडील ही ऍम्ब्यु बॅग हाताळत होते. मुलीला जिवंत ठेवण्यासाठी व्हेंटिलेटर मिळू शकला नाही आणि वैष्णवीचा तडफडून मृत्यू झाला, असा आरोप आता वैष्णवीच्या पालकांनी केला आहे. यवतमाळवरुन उपचारासाठी मुलीला नागपूरला आणून देखील तिचा जीव न वाचल्यामुळे तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

व्हेंटिलेटर कुठेत?

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील वैष्णवी राजू बागेश्वर या मुलीच्या मृत्यूने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. कोरोना काळात वेगवेगळ्या रुग्णालयांना व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात आला होता. व्हेंटिलेटरची खरेदीही करण्यात आल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. खरंतर आता कोरोनाइतकी प्रचंड रुग्णवाढही नाही. आरोग्य यंत्रणेवर महामारी इतका प्रचंड ताणही नाही. तरिही या तरुणीला वेळीच व्हेंटिलेटर शासकीय रुग्णालयात का मिळू शकला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.