कलम 144, कर्फ्यू आणि लॉकडाउन म्हणजे आहे तरी काय? या तिघांमधील असा जाणून घ्या फरक!

| Updated on: Jan 31, 2022 | 10:02 PM

Difference between lock down curfew and Section 144: भले तुम्हाला कलम 144, लॉकडाउन आणि कर्फ्यू हे तिन्ही गोष्टी आपल्याला एक सारख्या वाटत असल्या तरी या तिघांमध्ये खूप मोठा फरक आहे चला तर मग जाणून घेऊया यामध्ये नेमका काय फरक आहे त्याबद्दल..

कलम 144, कर्फ्यू आणि लॉकडाउन म्हणजे आहे तरी काय? या तिघांमधील असा जाणून घ्या फरक!
Follow us on

मुंबई : भले तुम्हाला या तिन्ही गोष्टी एकसारख्या वाटत असल्या तरी या तिघांचा अर्थ मात्र वेगवेगळाआहे. कलम 144 , लॉकडाउन आणि कर्फ्यू यामध्ये फरक असतो व ओमिक्रॉनच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी देशातील अनेक शहरांमध्ये कलम 141 (Section 144) लागू करण्यात आलेला आहे. फक्त कोरोना (Coronavirus) च नाही तर अन्य दुसऱ्या कारणामुळे सुद्धा हा कलम लागू करण्यात आला आहे. हा कलम लागू झाल्यावर चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एका जागेवर एकत्रित जमा होऊ शकत नाही. देशामध्ये संक्रमण रोखण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन (Lockdown) लावले गेले आणि त्यानंतर कलम 144. अशावेळी प्रश्न निर्माण होतो की नेमकं कलम 144 लागू ,लॉकडाऊन आणि कर्फ्यू (Curfew) यांच्यामध्ये काय फरक आहे. या तिन्ही प्रकारातील परिस्थिती वेगवेगळी असतात. चला तर मग जाणून घेऊ या प्रकाराविषयी महत्त्वाची माहिती…

बिजनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार या तिघांमध्ये खूप फरक पाहायला मिळतो. यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लागू केली जाते, यांना कधी आणि केव्हा लागू केले जावे हे शहरातील कलेक्टर जिल्हाधिकारी ,पोलिस कमिशनर आणि मेडिकल ऑफिसर यांच्या हाती असते.

कलम 144 लागू आणि कर्फ्यू काय असतो ,जाणून घेऊया यांच्यातील फरक

कलम 144 : संवैधानिक भाषेमध्ये याला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर म्हणजेच सीआरपीसी कलम 144 म्हटले जाते. देशामध्ये पहिल्यांदा हे कलम 1861 वर्षी बडोदा राज्यामध्ये लागू करण्यात आले होते.कोणत्याही शहरांमध्ये जिल्हाधिकारी नोटिफिकेशन दिल्या नंतरच हा कलम लागू करू शकतात. जेव्हा शहरामध्ये अशांती, असुरक्षितता आणि दंगे घडण्याचा धोका उद्भवतो अशावेळी हा कलम लागू केला जातो. शहरात हे कलम लागल्यानंतर एका जागेवर 4 किंवा यापेक्षा अधिक लोक एकत्र जमा होऊ शकत नाही.

लॉकडाउन : या परिस्थितीमध्ये अधिक तर अनेक गोष्टींवर बंदी लावली जाते परंतु आवश्यक वस्तूंवर व सामाना साठी परवानगी दिली जाते जसे की रेशन ,औषधे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण बाहेर जाऊ शकतो. लॉकडाउन लावण्याचा सर्वस्वी अधिकार शहरातील कलेक्टर किंवा चीफ मेडिकल ऑफिसर यांच्या हातात असते आणि यांच्या आदेशानुसार शहरांमध्ये लॉकडाऊन लावला जातो. शहरात आवश्यकता असेल तेव्हा लॉकडाऊन लावला जातो.

कर्फ्यू : बिजनेस इनसाइडर यांच्या मते, कर्फ्यू लावण्याचा सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकारी किंवा पोलीस कमिशनर यांच्या हाती असतो.कर्फ्यू एकंदरी शरीराची स्थिती पाहून लागू केली जाते जसे की शहरामध्ये एखाद्या वेळी दंगे ,मारामारी उद्भवण्याची स्थिती असेल अशा वेळी शहरातील घटना नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कर्फ्यू लावला जातो.

जाणून घेऊया यांच्यातील फरक

जेव्हा शहरांमध्ये कर्फ्यू लावला जातो तेव्हा आपत्कालीन सुविधांवर सुद्धा बंदी लावली जाते जसे की बँक ,एटीएम, खाण्याचे सामान, भाजीपाला, दुधाचे दुकान सुद्धा बंद केले जाते. व्यक्ती घराच्या बाहेर पडू शकत नाही फक्त प्रशासन पोलिस अधिकारी किंवा जवान यांनाच रस्त्यावर फिरण्यास परवानगी असते त्याचबरोबर कलम 144 लागू झाल्यावर फक्त आपत्कालीन वस्तूंवर सवलत मिळते जसे की एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर व्यक्ती घराच्या बाहेर वस्तू विकत घेण्यासाठी येऊ जाऊ शकतो.

लॉकडाउनच्या परिस्थितीच्या वेळी आपत्कालीन परिस्थिती निगडित असलेले आणि अन्नधान्य निगडीत असलेल्या सर्व वस्तूंवर बंदी लावली जात नाही. या काळात जर एखादी व्यक्ती घराच्या बाहेर पडते तर अशा वेळी पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकत नाही परंतु अशा वेळी पोलीस त्या व्यक्तीला वॉर्निंग देऊन सोडू शकतात.

इतर बातम्या

मिरची खाल्ल्यावर नाका-डोळ्यांतून पाणी का येऊ लागतं? कारण इंटरेस्टिंग आहे!

वोटिंग रूम मधील “2 रुपये” वाला नियम , प्रत्येकाने मतदान करण्याआधी आवश्य जाणून घ्यायला हवे