Marathi News » Photo gallery » Know Why do we get a runny nose and Tears in eyes when we eat spicy food Check here all details
मिरची खाल्ल्यावर नाका-डोळ्यांतून पाणी का येऊ लागतं? कारण इंटरेस्टिंग आहे!
मिरची व तिखट खाल्ल्यानंतर आपल्या तोंडातून सी सी अशा प्रकारचा आवाज येण्यास सुरुवात होते आणि त्याच बरोबर नाक डोळे यांच्यातून थेट पाणी बाहेर पडू लागते. तुमच्यासोबत सुद्धा असे अनेकदा घडले असेल परंतु कधी तुम्ही विचार केला आहे का असे नेमके का घडते ?
आपल्यापैकी अनेकजण बाहेर गेल्यावर तेलकट, तुपकट ,तिखट - मसालेदार( spicy) पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त करत असतात. आपल्यापैकी अनेक जण हॉटेलमध्ये गेल्यावर तिखट पदार्थांवर मोठ्या प्रमाणात ताव मारत असतो परंतु जर एखाद्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये तिखट टाकले गेले असेल किंवा कळत नकळत तुमच्याकडून मिरची (chilli) खाली गेली असेल तर अशा वेळी खूपच त्रास सहन करावा लागतो. मिरची व तिखट खाल्ल्यानंतर आपल्या तोंडातून सी सी अशा प्रकारचा आवाज येण्यास सुरुवात होते आणि त्याच बरोबर नाक डोळे यांच्यातून थेट पाणी बाहेर पडू लागते. तुमच्यासोबत सुद्धा असे अनेकदा घडले असेल परंतु कधी तुम्ही विचार केला आहे का असे नेमके का घडते ? काय असे कारण आहे ज्यामुळे नाका - डोळ्यातून पाणी (tears) बाहेर पडते.
1 / 5
हॉटेलमध्ये किंवा आपण घरी एखादा तिखट व मसालेदार पदार्थ खातो याचा अर्थ की तुमचे तोंड मिरचीच्या संपर्कात येते आणि अशावेळी मिरचीची तिखट चव तुमच्या जिभेवर स्पर्श करून जाते. याचा अर्थ आपल्याला त्या वेळी तो पदार्थ खूप तिखट लागतो, खरेतर मिरचीमध्ये कॅपेसीसीन नावाचे एक केमिकल असते.
2 / 5
तसे पाहायला गेले तर ते केमिकल मिरचीसाठी खूप चांगली असते कारण की या केमिकलमुळे मिरचीचे पीक असते त्या पिकाला जनावर म्हणजेच प्राणी किंवा मनुष्य कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू शकत नाही. याचाच अर्थ असा की हे केमिकल मिरचीच्या पीकांची सुरक्षा करते जेणेकरून या पिकाची कोणत्याही प्रकारची नासधूस होऊ नये हा त्यामागचा उद्दिष्ट असतो.
3 / 5
एक केमिकल अशा प्रकारचे असते जसे की मानवाच्या तोंडाचा स्पर्श जेव्हा या केमिकल ला होतो अशा वेळी शरीरामध्ये जळण निर्माण होते त्यानंतर आपल्या शरीराची लाही लाही होऊ लागते आणि ही झालेली लाही लाही कमी करण्यासाठी आपण अनेकदा पाणी किंवा गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो.
4 / 5
आपल्या जिभेला तिखट लागल्यावर या केमिकलला शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि अशा वेळी शरीर यातील नाक आणि डोळ्यातून बाहेर पाणी पडू लागते. हे केमीकल आपल्या शरीरातून बाहेर निघावे म्हणून नाक आणि डोळ्यातून वाट मोकळी करण्यासाठी आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडते. आम्ही आशा करतो कि, आता तुम्हाला आपल्या डोळ्यातून नाकातून पाणी बाहेर येण्याचे कारण कळाले असेल.