AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडले, तपासाबाबत मोठा खुलासा; म्हणाल्या दादांच्या…

अजित पवार विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालावर सुनेत्रा पवारांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तपासातील त्रुटी आणि विविध यंत्रणांच्या चौकशीबाबत त्यांनी काय भूमिका मांडली, जाणून घ्या सविस्तर.

Ajit Pawar Plane Crash : अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडले, तपासाबाबत मोठा खुलासा; म्हणाल्या दादांच्या...
sunetra pawar ajit pawar
| Updated on: Mar 08, 2026 | 8:21 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालावर आता त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. पूर्ण अहवाल आल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित दादांच्या चौकशीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी वेगवेगळ्या एजन्सीमार्फत सुरु आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. आता फक्त प्राथमिक अहवाल आलाय, तो संपूर्ण अहवाल नाही. त्यामुळे याचा पूर्ण अहवाल आल्यानंतर यावर बोलेन, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर

अजित पवारांचा २८ जानेवारी २०२६ ला झालेल्या विमान अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रात हादरला आहे. या घटनेचा तपास DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय), AAIB (विमान अपघात तपास ब्युरो) आणि राज्य CID यांसारख्या विविध संस्थांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील अपघाताची प्राथमिक कारणे आणि निरीक्षणे नोंदवण्यात आली होती.

अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (ATC) दृश्यमानता ३ किमी असल्याचे कळवले होते, तरीही लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. वैमानिकाने लँडिंगसाठी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. धावपट्टी दिसल्याचा अहवाल दिल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली, मात्र त्यानंतर काही क्षणांतच विमानाचा ताबा सुटला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डेटा डाऊनलोड करण्याचे काम अद्याप बाकी

विमानाचा ब्लॅक बॉक्स (FDR आणि CVR) ताब्यात घेण्यात आला आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती मिळाली असली, तरी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचे (CVR) डेटा डाऊनलोड करण्याचे काम अद्याप बाकी आहे. बारामती विमानतळावर ‘विंड सॉक्स’ (वाऱ्याची दिशा दर्शवणारे साधन) योग्य ठिकाणी उपलब्ध नव्हते आणि तिथे अत्याधुनिक नेव्हिगेशनल साधनांची कमतरता असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणानुसार, जमिनीवर आदळण्यापूर्वी विमान उजव्या बाजूला झुकले (banked) होते. विमानाचा संपर्क तुटण्यापूर्वी वैमानिकाने “Oh S**t…” असे उद्गार काढल्याचे रेकॉर्ड झाले आहे. अपघातानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) VSR Ventures या कंपनीच्या चार विमानांचे उड्डाण थांबवले असून कंपनीचे विशेष ऑडिट सुरू केले आहे, असेही यात म्हटले आहे.

Follow Us
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...