AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव, सुरुवातीलाच केल्या दोन मोठ्या घोषणा, खास काय?

महाराष्ट्र राज्याचा २०२६ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असून, यावेळी त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक आणि 'गतिमान नागरी सन्मान' पुरस्काराची घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव, सुरुवातीलाच केल्या दोन मोठ्या घोषणा, खास काय?
ajit pawar devendra fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 2:25 PM
Share

महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सन्मानार्थ दोन मोठ्या घोषणा केल्या.

अजितदादांच्या स्मृतींना उजाळा

अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांचे राज्याच्या अर्थकारणातील योगदान अधोरेखित केले. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते. त्यांनी विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती.

अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खालील दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे एक भव्य स्मारक राज्य सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे. तसेच प्रशासकीय कामात आणि नागरी सोयीसुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी ‘अजित पवार गतिमान नागरी सन्मान’ हा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. हा अर्थसंकल्प मी पूर्णपणे अजितदादांना समर्पित करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपला आदर व्यक्त केला.

अजित पवार हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि कामाच्या गतीसाठी ओळखले जायचे. त्यांच्या याच गतिमान कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्यासाठी हा नवीन पुरस्कार दिला जाणार आहे. या घोषणेनंतर उपस्थित सदस्यांनी सभागृहाने बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

अजित पवारांचे निधन

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच त्यांच्या विमानाला अपघात झाला. यानंतर ते विमान खाली कोसळताच त्याने पेट घेतला. सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक निवेदन जारी केले. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ते सातत्याने करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...