AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याची कमाई पाहून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ढसाढसा रडले

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कारकि‍र्दीमधील सर्वात फ्लॉप चित्रपट. ज्याच्या अपयशानंतर निर्माता, दिग्दर्शक आणि शाहरुख खान टेबलावर बसून ढसाढसा रडले.

शाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याची कमाई पाहून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ढसाढसा रडले
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 08, 2026 | 8:28 AM
Share

Shah Rukh Khan : 1990 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून त्याने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सलग यशस्वी चित्रपटांमुळे त्याला ‘किंग खान’ म्हणूनही ओळख मिळाली.

मात्र यशाच्या शिखरावर असतानाही एका चित्रपटाच्या अपयशाने शाहरुख खान खूप खचला होता. इतकेच नाही तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्री जूही चावला सुद्धा या अपयशामुळे भावूक झाली होती. या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने निर्माता म्हणूनही पदार्पण केले होते. हा चित्रपट होता ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’. जो 2000 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अझीझ मिर्झा यांनी केले होते. चित्रपटात शाहरुख खान आणि जूही चावला मुख्य भूमिकेत होते.

चित्रपट फ्लॉप झाल्यावर तिघेही रडले

शाहरुख खानने अभिनेत्री प्रिती झिंटाच्या Up Close and Personal with PZ या टॉक शोमध्ये या चित्रपटाबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले की त्या काळात हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठ्या फ्लॉपपैकी एक मानला जात होता.

शाहरुख म्हणाला होता की, ‘मी माझ्या कोणत्याही चित्रपटासाठी टेबलावर बसून कधी रडलो नाही. पण या चित्रपटासाठी आम्ही तिघेही प्रचंड रडलो. आम्हाला सतत वाटत होते की आपल्याकडून काय चूक झाली. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ हा चित्रपट अजिबात चालला नाही आणि तो आमच्या करिअरमधील मोठ्या फ्लॉपपैकी एक ठरला.’

बॉक्स ऑफिसवर अपयश

‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ हा चित्रपट सुमारे 13 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 5 कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त कमाई केली. भारतात या चित्रपटाची एकूण कमाई सुमारे 18.2 कोटी रुपये झाली आणि त्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

या चित्रपटाला IMDb वर 6.2 इतकी रेटिंग मिळाली आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला हा चित्रपट नंतर अनेक प्रेक्षकांना आवडला आणि आजही काहीजण तो वेगळ्या विषयामुळे लक्षात ठेवतात.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी