भारतातील अशी जमात, जिथे लग्नानंतर नवऱ्याला सोडावं लागतं स्वतःचं घर; कारण… जाणून घ्या अनोखी परंपरा
आपल्याला माहित असलेल्या परंपरेनुसार लग्नानंतर मुलगी मुलग्याच्या घरी म्हणजेच सासरी जाते. माहेर सोडून ती कायमची आपल्या पतीजवळ आणि सासरच्या मंडळीसोबत राहते. पण आपल्याच भारतात असा एक समाज आहे, जिथे महिलांची सत्ता चालते, जिथे लग्नानंतर नवरा हा नवरीच्या घरी राहायला जातो. तिच आडनावही लावतो.जाणून घ्या...

आपल्याकडे लग्न झालं की मुलगी सासरी जाते, नव्या घरात संसार सुरू करते. पण आपल्या भारतात एक समाज असा आहे जिथे लग्नानंतर नवऱ्यालाच बायकोच्या घरी राहायला जावं लागतं.
भारताच्या मेघालय राज्यात खासी नावाचा समाज राहतो. हा समाज मातृवंशीय आहे. म्हणजेच कुटुंबाची वंशपरंपरा आईच्या बाजूने पुढे चालते. त्यामुळे लग्न करून नवरा बायकोच्या घरी राहायला जातो.नवऱ्यांना बायकोचे आडनावही लावावे लागते.
मुलीला मिळतो वारशाचा हक्क : खासी समाजात संपत्तीच्या वारशासाठी मुलीला निवडले जाते. सर्वात लहान मुलीला घर आणि कौटुंबिक मालमत्तेचा वारसा मिळतो. तिला 'का खुददुह' असं म्हटलं जातं.
मुलांची ओळख आईच्या कुटुंबातून : या समाजात मुलांची वंशपरंपरा आईच्या बाजूने मोजली जाते. त्यामुळे आईचं कुटुंब , नातेसंबंध आणि कुळपरंपरा यांना विशेष महत्त्व आहे.लग्नानंतरही स्त्रीचं तिच्या माहेरशी नातं कायम राहतं.
खासी समाजात महिलांना विशेष स्थान आहे. त्यामुळे त्या कुटुंबप्रमुख असतात. घरातील प्र्त्येक निर्णय महिला घेतात. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये महिलांचा जास्त सहभाग असतो.
जगभरातील लोकांना या परंपरेच कुतुहल : लग्नानंतर मुलगी सासरी जाते हीच पद्धत सगळीकडे असते. त्यामुळे लग्नानंतर नवरा नवरीच्या घरी जातो ही गोष्ट अनेकांना वेगळी वाटते. मात्र खासी समाजाचा परंपरेचा आणि सामाजिक रचनेचा हा एक भाग आहे.