TRP: कशी ठरविली जाते टीव्ही न्यूज चॅनल्सची रेटिंग, BARC म्हणजे नेमके काय? टीआरपी मोजण्यासाठी कोणत्या तांत्रिक पद्धतीचा केला जातो वापर?

| Updated on: Mar 17, 2022 | 5:43 PM

टीआरपीचे मूल्यमापन करण्यासाठी प्रेक्षकांद्वारे नेहमी पाहिले जाणारे प्रोग्राम आणि वेळ यांना सातत्याने रेकॉर्ड केले जाते. या मिळालेल्या माहितीला 30 पटीने गुणून प्रोग्रामचे एव्हरेज रेकॉर्ड काढले जाते.

TRP: कशी ठरविली जाते टीव्ही न्यूज चॅनल्सची रेटिंग,  BARC म्हणजे नेमके काय? टीआरपी मोजण्यासाठी कोणत्या तांत्रिक पद्धतीचा केला जातो वापर?
TV9 BARC
Image Credit source: Tv9
Follow us on

टेलिव्हिजन न्यूज विश्वामध्ये टीव्ही 9 मराठी देशातील नंबर 1 न्यूज चॅनेल बनला आहे. होळीच्या एक दिवस आधी गुरुवारी ही रेटिंग जाहीर झाली. बार्क (BARC) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या रेटिंग मध्ये TV9 मराठी सर्व न्यूज चॅनेलला (News Channels) मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे इतकेच नाही तर 74 आठवड्यानंतर आलेल्या रेटिंगमध्ये फक्त एकमेव न्यूज चॅनेल टीव्ही 9 मराठी क्रमांक 1 वर आहे. या सर्व गोष्टींमध्ये टीव्ही 9 नेटवर्कने पहिला स्थान पटकावलेला आहे. बार्क इंडिया (BARC India) कडून टेलेविजन न्यूज चॅनेलची रेटिंग जाहीर केली जाते. ज्या पद्धतीने वर्तमानपत्रांच्या बाबतीत ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ABC) ही वर्तमानपत्रांची रेटिंग जाहीर करते त्याचप्रमाणे न्यूज चॅनेल च्या बाबतीत बीएआरसी हे मंडळ न्यूज चॅनेलचे रेटिंग जाहीर करत असते.

बार्ककडून टीवी 9 ला 16.8 रेटिंग दिली गेली आहे त्याचबरोबर अन्य चॅनेलला कमी रेटिंग दिले गेले. आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की, बीएआरसी द्वारे टीव्ही 9 ला रेटिंग देणारे BARC नेमके आहे तरी कोण? बीएआरसी कशाप्रकारे रेटिंग ठरवते? कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर ही रेटिंग ठरवली जाते ?,चला तर जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरात बद्दल…

BARC म्हणजे नेमके काय?

बार्क (BARC) चे पूर्ण स्वरूप ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (Broadcasting Audience Research Council) आहे. हे टीआरपी म्हणजेच टेलिविजन रेटिंग पॉइंट ठरवते. बार्क (BARC) इंडिया एक संयुक्त उद्योग उपक्रम आहे ज्यास प्रसारणकर्ता (IBF), जाहिरातदार (ISA), जाहिराती आणि माध्यम संस्था (AAAI) चे प्रतिनिधित्व करणारे स्टॉकहोल्डर निधिबद्ध करतात. BARC India ची स्थापना वर्ष 2010 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. BARC हि जगभरातील सर्वात मोठी टेलिव्हिजन चे मूल्यमापन करणारी संस्था आहे.

कोणत्या पद्धतीचा वापर करते बार्क?

आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आणि उद्योग यांचे मिश्रण करणे हे बार्क चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.BARC India ही संस्था टेलिव्हिजन प्रेक्षक यांचे मूल्यमापन करणारी संस्था म्हणून एक पारदर्शी संचालन करते, अशी देखील ओळख जगभरात या संस्थेबद्दल केली जाते. ही व्यवस्था संपूर्णपणे पारदर्शी असते त्याच बरोबर ही व्यवस्था संपूर्णपणे सुरक्षित आणि भविष्यातील अनेक तंत्रज्ञान पद्धतीवर अवलंबून असते असे देखील म्हटले जाते.

TRP म्हणजे काय?

टीआरपी चे सक्षिप्त स्वरूप Television Rating Point असे आहे. टीआरपी हे असे एक साधन आहे ज्या साधनाच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर कोणता प्रोग्राम किंवा कोणते टेलिव्हिजन चॅनल सर्वात जास्त पाहिले जात आहे. या टीआरपीच्या माध्यमातूनच प्रेक्षकांनी किती वेळ एखादा चॅनेल पाहिलेला आहे, याचे मूल्यमापन केले जाते. एखाद्या न्यूज चॅनेल ची किंवा एखाद्या प्रोग्रामची लोकप्रियता ठरवण्यासाठी टीआरपीची रेटिंग अत्यंत महत्त्वाची ठरत असतात.

भारतात ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (बार्क) नावाची ही संस्था आहे,ती संस्था टीव्ही चॅनलवरील टीआरपी चे मूल्यमापन करण्याचे कार्य करते. ही संस्था कोणते टेलिव्हिजन न्यूज चॅनल,, एखादा प्रोग्राम जास्त वेळ लोकांकडून पाहण्यात आलेला आहे व त्याचबरोबर लोकांनी कोणत्या न्यूज चॅनेल ला किंवा प्रोग्राम ला जास्त लोकप्रियता दिली आहे. ही संस्था वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तपासून शोधण्याचा प्रयत्न करते.

अशी तपासली जाते टीआरपी?

ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (बार्क) अनेक हजार फ्रीक्वेंसीचा डेटा घेऊन संपूर्ण टिव्ही चॅनेल च्या टीआरपीचे अनुमान लावते. ही संस्था टीआरपी चे मूल्यमापन करण्यासाठी एका विशेष गॅजेटचा वापर करते. टीआरपी मोजण्यासाठी काही विशिष्ट जागेवर बॅरोमीटर किंवा पीपल मीटर लावले जातात त्याचबरोबर काही हजारो प्रेक्षकांचा सॅम्पल म्हणजे नमुना म्हणून एक सर्वे देखील केला जातो.

सॅम्पल मध्ये समावेश करण्यात आलेल्या प्रेक्षकांना म्हणजेच जे प्रेक्षक जे टिव्ही पाहत असतात, त्यांना प्रतिनिधी समजून त्यांना १००टक्के मानले जाते. पीरोमीटर काही फ्रिक्वेन्सी च्या आधारावर ओळखण्याचा प्रयत्न करते की ,कोणता प्रोग्राम किंवा एखादा चॅनेल किती वेळा आणि सर्वात जास्त पाहिला जात आहे. या मीटरद्वारे एक – एक मिनिट टीव्ही ची माहिती मॉनिटरिंग संस्थेपर्यंत पोहोचवली जाते.ही टीम बॅरोमीटरद्वारे प्राप्त झालेल्या माहितीद्वचे विश्लेषण करते आणि कोणत्या चॅनेलला किंवा प्रोग्राम ला किती टीआरपी मिळाली आहे याबद्दलचा अहवाल प्रदर्शित करते.

टीआरपी से मूल्यमापन करण्यासाठी एका प्रेक्षकाने द्वारे नेहमी पाहिल्या जाणाऱ्या प्रोग्राम ला आणि वेळेला सातत्याने रेकॉर्ड केले जाते आणि मग हा डेटा 30 पटीने गुणुन त्या प्रोग्रामचे रेकॉर्ड काढले जाते. हे बॅरोमीटर कोणत्याही टीव्ही न्यूज चॅनेल बद्दल आणि त्याच्या प्रोग्राम बद्दल संपूर्ण माहिती देत असते.

टेलिविजन रेटिंग पॉइंट (TRP) च्या हिशेबानुसार सर्वात जास्त लोकप्रियता चॅनेल ची लिस्ट बनवली जाते आणि मग आठवड्यातून किंवा महिन्यातून टॉप 10 टीआरपी टीव्ही सिरीयल ,टीव्ही न्यूज चॅनेल यांची माहिती सर्वांना सांगितली जाते.

का गरजेची आहे TRP?

TRP चा थेट का संबंध टीव्ही किंवा न्यूज चॅनलच्या कमाईशी असतो. ज्या चॅनेलचा TRP कमी असतो म्हणजेच एखादे चॅनल प्रेक्षक कमी पाहत असतात, त्या चॅनेलची टीआरपी कमी होऊन जातो. त्या चॅनेल वर जास्त प्रमाणात जाहिरातदाराकडून जाहिराती प्रदर्शित केल्या जात नाही किंवा ज्या जाहिराती प्रसारित केल्या जातात त्या अगदी कमी दराने प्रसारित होत असतात. जाहिरातदारांसाठी टीआरपी हे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरत असतो. ज्या चॅनेल ची किंवा प्रोग्रामची टीआरपी रेटिंग जास्त असते.या चॅनल ला प्रेक्षक जास्त पसंती देत असतात आणि म्हणूनच जाहिरातदारांचा कल देखील अशाच न्यूज चॅनेल किंवा प्रोग्राम यांच्याकडे असतो. कोणत्याही जाहिरातदारांना आपल्या उत्पादनाची ओळख व उत्पादनाबद्दल ची सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी वाटत असते म्हणूनच प्रत्येक जाहिरातदार जास्त टीआरपी असलेल्या चॅनल कडे आपोआप वळतात.

हेही वाचा:

TV9 Marathi no.1 | महाराष्ट्रात ‘tv9 मराठी’चा दबदबा, बार्क रेटिंगमध्ये अव्वल

चुकीच्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटींना मोजावी लागणार किंमत; दंडासह तुरुंगवारीचा दणका