TV9 Marathi no.1 | महाराष्ट्रात ‘tv9 मराठी’चा दबदबा, बार्क रेटिंगमध्ये अव्वल
महाराष्ट्रात (maharshtra) 'टीव्ही 9 (Tv9 )मराठी'चा दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) ‘टीव्ही 9 मराठी’चा (tv9 Marathi) दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. ऐन होळीच्या दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’ने रंगांची उधळण केली आहे. 29 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ हे रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर पोहोचणारे पहिले मराठी न्यूज चॅनेल ठरले होते. युद्धापासून महाराष्ट्रातील राजकीय बातम्या, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, यांचे सुपरफास्ट अपडेट्स ‘टीव्ही 9 मराठी’ने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळेच प्रेक्षकांनीही आपल्या प्रेमाची पोचपावती म्हणून ‘टीव्ही 9 मराठी’वर पसंतीची मोहोर उमटवली आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

