पुणे मेट्रोच्या कामादरम्यान स्वारगेटजवळ आढळली 2 भुयारं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पुणे : मेट्रोच्या कामादरम्यान पुण्यातील स्वारगेट परिसरात 2 भुयारं आढळली आहेत. जमिनीखाली पक्क्या विटांचा उपयोग करुन ही भुयारं बांधण्यात आली आहेत. मात्र, ही भुयारं नेमकी कधी आणि कोणी बांधली याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. स्वारगेट येथील राजर्षी शाहू महाराज बस स्थानकाच्या समोरील बाजूला पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु होते. त्यावेळी बस स्थानकाची बाजू खचली. असाच […]

पुणे मेट्रोच्या कामादरम्यान स्वारगेटजवळ आढळली 2 भुयारं!
Follow us on

पुणे : मेट्रोच्या कामादरम्यान पुण्यातील स्वारगेट परिसरात 2 भुयारं आढळली आहेत. जमिनीखाली पक्क्या विटांचा उपयोग करुन ही भुयारं बांधण्यात आली आहेत. मात्र, ही भुयारं नेमकी कधी आणि कोणी बांधली याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

स्वारगेट येथील राजर्षी शाहू महाराज बस स्थानकाच्या समोरील बाजूला पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु होते. त्यावेळी बस स्थानकाची बाजू खचली. असाच खड्डा त्याच्या दुसऱ्या बाजूला घेत असताना तेथेही खड्डा पडला. त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाहणी केली असता या खड्ड्यांमधून पूर्व, पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, अशाप्रकारे जमिनीखाली भुयारं सापडण्याची उदाहणं इतर ठिकाणीही पाहायला मिळालेली आहेत. त्यातील अनेक भुयारं ही अनेक वर्षांपूर्वी बांधल्याचे समोर आले आहे. कालांतराने जमिनीखाली गेलेली ही भुयारं नव्या बांधकामाच्यावेळी सापडतात.