डिलिव्हरी युनिटमधील 9 नर्स एकाचवेळी प्रेग्नंट, डॉक्टर आवाक्

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

वॉशिंग्टन (अमेरिका) : गरोदर होणे ही कुठल्याही स्त्रीला पूर्णत्वाला नेणारी गोष्ट असते. पण अमेरिकेतील मेन मेडिकल सेंटर हॉस्पिटलच्या 9 परिचारिका (नर्स) एकाचवेळी गरोदर राहिल्या आहेत.आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व परिचारिका डिलिव्हरी युनिटमध्येच काम करतात. या नऊ परिचारिकांची डिलिव्हरी एप्रिल ते जुलै महिन्यात होणार आहे. रुग्णालय प्रशासनाला ही गोष्ट समजल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावारही उरला नाही. रुग्णालय प्रशासनाने […]

डिलिव्हरी युनिटमधील 9 नर्स एकाचवेळी प्रेग्नंट, डॉक्टर आवाक्
Follow us on

वॉशिंग्टन (अमेरिका) : गरोदर होणे ही कुठल्याही स्त्रीला पूर्णत्वाला नेणारी गोष्ट असते. पण अमेरिकेतील मेन मेडिकल सेंटर हॉस्पिटलच्या 9 परिचारिका (नर्स) एकाचवेळी गरोदर राहिल्या आहेत.आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व परिचारिका डिलिव्हरी युनिटमध्येच काम करतात. या नऊ परिचारिकांची डिलिव्हरी एप्रिल ते जुलै महिन्यात होणार आहे.

रुग्णालय प्रशासनाला ही गोष्ट समजल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावारही उरला नाही. रुग्णालय प्रशासनाने लगेचच आपल्या फेसबुक पेजवर ही गुड न्यूज शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना त्यांनी सर्व परिचारिकांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आठ परिचारिका दिसत आहेत. त्यासोबत त्यांच्या हातात रंगीबेरंगी पेपर असून त्यावर त्यांची डिलिव्हरीची तारीख लिहिली. तसेच हा फोटो पोस्ट केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या सर्वांचे अभिनंदनही केले आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या नर्समधील काही महिलांचे हे पहिले गरोदरपण आहे. तर काही जणींचे दुसरे किंवा तिसरे आहे. विशेष म्हणजे गरोदर असलेल्या या सर्व नर्समध्ये प्रचंड प्रमाणात एकी आहे. जी हॉस्पिटलमध्ये काम करतानाही दिसून येते. दरम्यान हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. त्यासोबत या फोटोवर “ही प्रेग्नेंसी प्लॅन केली आहे.” अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहे.