ड्रग्जमुळे वर्षभरात नागपुरात 94 तरुणांच्या आत्महत्या, सीबीआय चौकशी करा, काँग्रेस नेते आशिष देशमुखांची मागणी

| Updated on: Sep 17, 2020 | 9:54 PM

गेल्या वर्षभरात नागपुरात ड्रग्जमुळे तब्बल 94 तरुणांनी आत्महत्या केली आहे (Suicide in Nagpur due to Drugs).

ड्रग्जमुळे वर्षभरात नागपुरात 94 तरुणांच्या आत्महत्या, सीबीआय चौकशी करा, काँग्रेस नेते आशिष देशमुखांची मागणी
Follow us on

नागपूर : गेल्या वर्षभरात नागपुरात ड्रग्जमुळे तब्बल 94 तरुणांनी आत्महत्या केली आहे (Suicide in Nagpur due to Drugs). ही माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून समोर आली आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर नागपुरातील ड्रग्ज कनेक्शनची सीबीआय चौकशी करा, अशी मगाणी काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे (Suicide in Nagpur due to Drugs).

“मुंबईप्रमाणे नागपुरातील ड्रग्ज माफियांचा शोध घ्या. नागपुरात तरुणांना ड्रग्ज कोण पुरवते? याचा शोध घ्या, यासाठी सीबीआय चौकशी लावा”, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

नागपुरात मोठ्या संख्येने तरुणांनी ड्रग्जसाठी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील तरुणाईही ड्रग्जच्या विळख्यात अडकली असल्याचे यातून समोर आलं आहे.

नुकतेच बॉलिवूडमध्येही ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच बॉलिवूडमध्ये अनेकजण ड्रग्जचे सेवन करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाला अटक केल्यानंतर रियाने एनसीबीला दिलेल्या 19 पानी निवेदनात विशेषत: सारा, रकुल आणि सिमॉन या तिघींची नावे दिल्याचा दावा आहे. या प्रकरणात 25 ए ग्रेड बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेण्यात आली आहेत, ज्यात अभिनेते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊस आणि इतरांचा समावेश आहे. एनसीबी आता अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील ए, बी आणि सी ग्रेड कलाकारांवर लक्ष केंद्रित करण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या :

मी निरपराध, मला या गुन्ह्यात गुंतवण्यात आलंय, रियाकडून 19 पानांचा जामीन अर्ज

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश