मी निरपराध, मला या गुन्ह्यात गुंतवण्यात आलंय, रियाकडून 19 पानांचा जामीन अर्ज

मी निरपराध, मला या गुन्ह्यात गुंतवण्यात आलंय, रियाकडून 19 पानांचा जामीन अर्ज

रियाने जवळपास 19 पानी जामीन अर्ज केला आहे. यात तिच्या वकिलांनी तिची सविस्तर बाजू मांडली आहे. (Rhea Chakraborty Bail application after NCB arrest)

Namrata Patil

|

Sep 09, 2020 | 7:26 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रियाला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तिची रवानगी भायखळ्यातील महिलांच्या जेलमध्ये करण्यात आली आहे. (Rhea Chakraborty Bail application after NCB arrest)

रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला आहे. “आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,” असं तिने आपल्या जामीन अर्जात म्हटलं आहे. रियाच्या या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यावेळी तिची सुटका होते की ती जेलमध्येच काही दिवस राहते, हे स्पष्ट होणार आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला काल दुपारी अटक केली. त्यानंतर रात्री आठ वाजता तिचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रिमांड घेण्यात आला. यावेळी तिला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी रियाच्या वकिलांनी तिला जमीन द्यावा म्हणून अर्ज केला. मात्र कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. ही सुनावणी रात्री 10 पर्यंत चालली.

यामुळे रियाला रात्रभर एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्यात आलं. आज सकाळी तिला भायखळा जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर तिच्या वकिलांनी तिच्या जामिनासाठी एनसीबीच्या विशेष कोर्टात अर्ज केला. त्यावर उद्या सुनावणी आहे.

रियाने जवळपास 19 पानी जामीन अर्ज केला आहे. यात तिच्या वकिलांनी तिची सविस्तर बाजू मांडली आहे.

“मी निरपराध आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला या गुन्ह्यात गुंतवण्यात आलं आहे. माझ्याकडून कोणतेही ड्रग्स जप्त करण्यात आलेले नाही. माझ्याविरोधात जी कलम लावण्यात आली आहेत ती जामीन पात्र आहेत. एनसीबीने माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसताना वेगवेगळी कलम लावली आहेत. मी केवळ माझा बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत याच्या सांगण्यावरुन त्याला सेवन करण्यासाठी ड्रग्स घेतले होते. मात्र, मला आता ड्रग्सच्या रॅकेटचा भाग असल्याचं दाखवलं जात आहे.

आम्हाला कैझान या आरोपीच्या जबाबावरुन अटक करण्यात आली आहे. मात्र, कैझानला ज्या दिवशी अटक केली, त्याच दिवशी त्याला जामीन मिळाला आहे. यासह अनेक मुद्दे तिने जामीन अर्जात मांडले आहेत.”

या प्रकरणातील इतर आरोपी शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांना आज न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. यामुळे त्यांनी ही जामिनासाठी अर्ज केला आहे. रियासह सर्वच आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या या प्रकरणात निकाल येण्याची शक्यता आहे. (Rhea Chakraborty Bail application after NCB arrest)

संबंधित बातम्या : 

अटकेनंतर रियाचा मुक्काम एनसीबी कार्यालयात, भायखळा तुरुंगात रवानगी होणार

Rhea Chakraborty Arrest | रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें