काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांची हकालपट्टी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांना आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) दणका दिला आहे. मारहाण करणाऱ्या युवसेनेच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी ट्विटरद्वारे दिली. “राग दहशतवादाविरुद्ध ठेवावा, निष्पापांवर का ?” “दहशतवादाची सजा कोणत्याही भारतीयास नको”, अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं. There was an unfortunate incident yest […]

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांची हकालपट्टी
Follow us on

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांना आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) दणका दिला आहे. मारहाण करणाऱ्या युवसेनेच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी ट्विटरद्वारे दिली.

“राग दहशतवादाविरुद्ध ठेवावा, निष्पापांवर का ?” “दहशतवादाची सजा कोणत्याही भारतीयास नको”, अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, “काल यवतमाळमध्ये काही जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांबाबत दुर्दैवी घटना घडली. याबाबत आम्ही कालच पत्रक प्रसिद्ध करुन आमची भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा संवेदनशील आहेच, मात्र आमच्या भूमिकेकडून दुर्लक्ष करुन आमची बदनामी करण्याचा काहींचा हेतू असू शकतो.

मारहाण करणाऱ्यांमध्ये जे सहभागी होतं, त्यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काश्मिरींनी मारुन दहशतवादविरोधी राग व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही राग समजू शकतो, पण हा राग दहशतवादाविरोधात असावा, निष्पापांवर नको, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Pulwama Attack : यवतमाळमध्ये युवासेनेकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी 21 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या 3 ते 4 काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.  युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली. वैभवनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यां ताब्यात घेतलं. दरम्यान, मारहाणीनंतर काश्मिरी विद्यार्थी लोहारा याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या हल्ल्यातील आणखी काही कार्यकर्त्यांचा शोध सुरु केला आहे. या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

संबंधित बातमी 

Pulwama Attack : यवतमाळमध्ये युवासेनेकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण