Pulwama Attack : यवतमाळमध्ये युवासेनेकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

यवतमाळ : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या 3 ते 4 काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.  युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली. वैभवनगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यां ताब्यात घेतलं आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जेवढा रोष व्यक्त केला जातोय, …

Pulwama Attack : यवतमाळमध्ये युवासेनेकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

यवतमाळ : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या 3 ते 4 काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.  युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली. वैभवनगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यां ताब्यात घेतलं आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जेवढा रोष व्यक्त केला जातोय, तेवढाच रोष दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक काश्मिरींविरोधातही व्यक्त होतोय. दहशतवादी संघटनांकडून 14 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवानांना प्राण गमावावे लागले. या आत्मघातकी हल्ल्यात काश्मिरी तरुणाचा सहभाग असल्यामुळे सध्या काश्मिरी तरुणांवर राग व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.

दरम्यान, मारहाणीनंतर काश्मिरी विद्यार्थी लोहारा याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील आणखी काही कार्यकर्त्यांचा शोध सुरु केला आहे. या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

पुलवामा घटनेनंतर देशातील अनेक भागातील काश्मिरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी काश्मीरी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, असं वक्तव्य केले होते. यामुळेही  नव्या वादाला तोंड फुटले होते.

“आर्मीच्या एका माजी कर्ललने आवाहन केलं आहे, काश्मीरला जाऊ नका, पुढचे दोन वर्ष अमरनाथ यात्रेला जाऊ नका, हिवाळ्यात कपडे विकायला येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून काश्मीरची कोणतीही वस्तू विकत घेऊ नका. काश्मीरच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाका, मी याच्याशी सहमत आहे”, असं ट्वीट तथागत रॉय यांनी केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *