राणा दाम्पत्याची मतदानासाठी बुलेटस्वारी, किती मतांनी निवडून येणार? नवनीत राणा म्हणाल्या…
भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांची प्रतिष्ठा देखील अमरावती मतदारसंघात पणाला लागलेली आहे. जनता आता नेमकी कोणाकडे मतदानाचा कॏल देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आज मतदान करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बुलेटवरून जोडीनं प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी येथे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. यशोमती ठाकूर यांचे मतदान केंद्र असलेल्या मोझरी येथे नुकतीच मतदान प्रक्रिया सुरू झाली असून भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांची प्रतिष्ठा देखील अमरावती मतदारसंघात पणाला लागलेली आहे. जनता आता नेमकी कोणाकडे मतदानाचा कॏल देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आज मतदान करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बुलेटवरून जोडीनं प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नवनीत राणा यांनी भगव्या रंगाची साधी साडी परिधान केली होती. टीव्ही ९ मराठीशी बोलताना नवनीत राणांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून....

