KKR vs PBKS : Sunil Narine चं कडक अर्धशतक, ऑरेंज कॅपमध्ये मोठी उडी

KKR vs PBKS Sunile Narine Fifty : केकेआरचा ऑलराउंडर सुनील नरेन याने पंजाब विरुद्ध तडाखेदार अर्धशतक झळकावलं आहे.

KKR vs PBKS : Sunil Narine चं कडक अर्धशतक, ऑरेंज कॅपमध्ये मोठी उडी
sunil narine fifty ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 9:07 PM

कोलकाता नाईट रायडर्सचा विस्फोटक ओपनर बॅट्समन सुनील नरीन याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील झंझावात सुरुच ठेवला आहे. नरीनने पंजाब किंग्स विरुद्ध 42 व्या सामन्यात आठव्या ओव्हरमध्ये सलग 2 चौकार ठोकून अर्धशतक ठोकलं आहे. नरीनने या अर्धशतकासह कोलकाता नाईट रायडर्सला अफलातून सुरुवात मिळवून दिली. तसेच दुसऱ्या बाजूने नरीनला फिलीप सॉल्टची चांगली साथ मिळाली.

कगिसो रबाडा कोलकाताच्या डावातील आठवी ओव्हर टाकायला आला. सुनीलने या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर सलग चौकार ठोकत अर्धशतक झळकावलं आहे. सुनीलच्या आयपीएलच्या कारकीर्दीतील हे सहावं अर्धशतक ठरलं आहे. सुनीलने हे अर्धशतक 226.09 च्या स्ट्राईक रेटने पूर्ण केलं. सुनीलने अवघ्या 23 बॉलमध्ये ही फिफ्टी पूर्ण केली. सुनीलच्या या अर्धशतकी खेळीत 8 चौकार आणि 2 खणखणीत षटकारांचा समावेश होता.

सुनील अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. सुनीलने टॉप गिअर टाकत मोठे फटके मारले. मात्र राहुल चहरने सुनीलला रोखलं. राहुलने नरीनला विकेटकीपर जॉनी बेयरस्टोच्या हाती कॅच आऊट केलं. सुनीलने अर्धशतकानंतर एकूण 9 बॉलमध्ये 19 धावा केल्या. नरीनने 32 बॉलमध्ये 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 221.88 च्या स्ट्राईक रेटने 71 धावांची खेळी केली. नरीनला या 71 धावांमुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चांगला फायदा झालाय.

नरीन या 71 धावांच्या मदतीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट दुसऱ्या स्थानी जाऊन पोहचला आहे. त्यामुळे आता ऑरेंज कॅप होल्डर विराट कोहली याला धोका आहे. नरेनच्या नावावर या खेळीआधी 286 धावा होत्या. नरेनचा पहिल्या 10 फलंदाजांमध्येही समावेश नव्हता. मात्र आता नरेन 71 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. नरेनच्या नावे आता 357 धावा झाल्या आहेत. तर विराट कोहली 430 धावांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रायली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.