लग्नावरुन परतताना दुचाकीचा अपघात, तिघा भावांचा मृत्यू

| Updated on: Dec 01, 2019 | 12:05 PM

भरधाव वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे हे चांगलेच महागात पडू शकते हे अनेकदा समोर आले (accident in news delhi) आहे.

लग्नावरुन परतताना दुचाकीचा अपघात, तिघा भावांचा मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : भरधाव वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे हे चांगलेच महागात पडू शकते हे अनेकदा समोर आले (accident in news delhi) आहे. नुकतंच अतिवेगाने गाडी चालवल्याने एकाच परिवारातील तीन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रात्री 11.30 च्या सुमारास दिल्लीत हा अपघात (accident in news delhi) घडला. अपघातात मृत्यू झालेले तिघेही एकाच कुटुंबातील असून भाऊ आहेत. उस्मा, साद आणि हमजा असे मृत झालेल्या तिघांची नावे (accident in news delhi) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही लग्नावरुन आपल्या घरी परतत होते. त्यावेळी दिल्ली गेटजवळील रेड लाईटच्या 200 मीटर अंतरावर या त्यांचा अपघात झाला. ते तिघेही एकाच स्कूटीवर बसून वेगाने गाडी चालवत होते.

पोलिस कंट्रोल व्हॅनने स्कूटीला टक्कर दिली असा दावा या अपघातानंतर मृतांच्या परिवाराने केला आहे. त्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला. तर काही नातेवाईकांनी त्यांनी हेल्मेट घातल नव्हतं. त्यामुळे बचाव करण्यासाठी त्यांनी पोलिसांना पाहून पळ काढला असावा. याच दरम्यान पोलिसांच्या कंट्रोल व्हॅनने त्यांच्या स्कूटीला धडक दिली असावी ज्यात या तिघांचा मृत्यू (accident in news delhi) झाला.

विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोपही मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान सध्या या प्रकरणी पोलिसांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याप्रकरणी पोलिसांकडून त्या भागातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. ज्यामुळे नक्की हा अपघात कसा झाला. अपघातामागील नेमक कारण काय या सर्व गोष्टी उघड होतील.