Happy Birthday Amol Palekar | ‘चित्रकलाच पहिले प्रेम!’, अभिनयक्षेत्रात योगायोगाने आलेल्या अमोल पालेकरांच्या ‘खास’ गोष्टी!

| Updated on: Nov 24, 2020 | 11:01 AM

‘कौन कम्बख्त कहता है कि हिटलर मर गया’, असे म्हणणारे अमोल पालेकर आज 75 वर्षांचे झाले आहेत.

Happy Birthday Amol Palekar | ‘चित्रकलाच पहिले प्रेम!’, अभिनयक्षेत्रात योगायोगाने आलेल्या अमोल पालेकरांच्या ‘खास’ गोष्टी!
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे ‘चित्तचोर’ अभिनेते अमोल पालेकरांचा (Actor Amol Palekar) आज (24 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. ‘कौन कम्बख्त कहता है कि हिटलर मर गया’, असे म्हणणारे अमोल पालेकर आज 75 वर्षांचे झाले आहेत. अभिनयाच्या जगतातून सुट्टी घेऊन ते आता चित्रकलेचा छंद जोपासत एका चित्रकाराचे आयुष्य जगत आहेत. चित्रकला हेच माझे पहिले प्रेम असल्याचे अमोल पालेकर नेहमी म्हणतात. मनोरंजन विश्वाच्या या झगमगाटी जगात त्यांनी आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने स्वत: चे खास स्थान बनवले आहे (Actor Amol Palekar celebrating his 75 birthday).

अमोल पालेकर नेहमीच म्हणतात की, ‘मी एक प्रशिक्षित चित्रकार, अपघाताने झालेला अभिनेता, काळाच्या ओघात तयार झालेला निर्माता आणि माझ्या स्वतःच्या आवडीने झालेला दिग्दर्शक आहे’. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अमोलने जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला त्यांनी बँकेत लिपिक म्हणूनही काम केले. पदवी शिक्षणानंतर अमोल पालेकर यांनी ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये सुमारे आठ वर्षे नोकरी केली होती. सुरुवातीचे तीनही चित्रपट सिल्व्हर ज्युबिली हिट ठरल्यानंतर त्यांनी आपली बँकेतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

मैत्रिणीमुळे चित्रपट क्षेत्रात…

अमोल पालेकर नव्हे तर, त्यांच्या मैत्रिणीला नाट्यक्षेत्रामध्ये खूप रस होता. जेव्हा ती नाटकाच्या तालमी करायला जायची तेव्हा, अमोल पालेकर थिएटरच्या बाहेर उभे राहून तिची वाट बघायचे. एके दिवशी सत्यदेव दुबे या नामांकित रंगकर्मीचे लक्ष अमोल यांच्याकडे गेले. सत्यदेव दुबे यांनी त्यांना ‘शांतता…कोर्ट चालू आहे’ या प्रसिद्ध मराठी नाटकात काम करण्यासाठी आग्रह केला (Actor Amol Palekar celebrating his 75 birthday).

त्यांच्या ‘शांतता…’नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर सत्यदेव दुबे यांनी अमोलला सांगितले की, आता लोकांनी तुझ्या अभिनयाला गांभीर्याने घेतले आहे, तेव्हा पुढे त्यांनी अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घ्यावे. सत्यदेव दुबे यांचा हा सल्ला अंमलात आणून, पुढच्या नाटकासाठी त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

हिंदी चित्रपटांतील दमदार कारकीर्द

बासु चॅटर्जी यांच्या 1947मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे अमोल पालेकर यांनी हिंदी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्याचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट हिट ठरला आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘बातो-बातो में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’ यासारखे अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये ते मध्यमवर्गीय समाजातील नायकांचे प्रतिनिधित्व करताना दिसले. इतके सुपरडुपर हिट चित्रपट देणाऱ्या अमोल पालेकरांना चाहत्यांना ‘ऑटोग्राफ’ देणे मात्र आवडत नाही.

(Actor Amol Palekar celebrating his 75 birthday)