Gulf Cine Fest 2021 | मराठी चित्रपटांची ‘दुबई’वारी, ‘गल्फ सिने फेस्ट 2021’ परदेशात रंगणार!

'गल्फ सिने फेस्ट 2021'च्या माध्यमातून प्रथमच परदेशामध्ये 20 ते 23 जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रिमीयर सोहळा रंगणार आहे.

Gulf Cine Fest 2021 | मराठी चित्रपटांची ‘दुबई’वारी, ‘गल्फ सिने फेस्ट 2021’ परदेशात रंगणार!
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 5:53 PM

मुंबई : चंदेरी दुनियेचा झगमगाट विविध महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमधून आपल्याला पहायला मिळत असतो. मात्र कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कलाविश्वातील हा झगमगाटाचा दिमाख काहीसा कमी झाला आहे. मनोरंजनाचा वसा घेत प्रेक्षकांना सातत्याने काहीतरी नवं देऊ पाहणाऱ्या कलाकारांनी नाउमेद न होता नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या. हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार ‘गल्फ सिने फेस्ट 2021’ चे (Gulf Cine Fest 2021) आयोजन करत, पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे (Gulf Cine Fest 2021 in dubai).

‘गल्फ सिने फेस्ट 2021’च्या माध्यमातून प्रथमच परदेशामध्ये 20 ते 23 जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रिमीयर सोहळा रंगणार आहे.

मराठी चित्रपटांची मेजवानी

‘गल्फ सिने फेस्ट 2021’ ची संकल्पना खूप आगळीवेगळी असून यात बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये 2021 या वर्षामधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. उत्तम आशय विषयांच्या चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे (Gulf Cine Fest 2021 in dubai).

तीन दिवसांचा धमाकेदार सोहळा

‘5 जी इंटरनॅशनल’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसाच्या या रंजक सोहळ्यात चित्रपटांच्या मेजवानीसह रंजक कार्यक्रमांची रेलचेल प्रेक्षकांसाठी असणार आहे. ‘गल्फ सिने फेस्ट 2021’ च्या निमित्ताने रंगणारा मनोरंजनाचा हा धमाकेदार सोहळा रसिकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार हे नक्की. मराठीतील प्रसारमाध्यमांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे.

(Gulf Cine Fest 2021 in dubai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.