BMC Election 2025 : ‘या’ 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच; अन्…
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 साठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा तिढा वाढला आहे. ठाकरे सेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात मनसेने माहीम, विक्रोळी आणि शिवडी या तीन जागांची मागणी केली आहे. या पेचावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील जागावाटपावरून मुंबईत मोठा पेच निर्माण झाला आहे. मनसेने ठाकरे सेनेचे विद्यमान आमदार असलेल्या माहीम, विक्रोळी आणि शिवडी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये किमान तीन जागांची मागणी केली आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरू आहेत, मात्र या विशिष्ट मतदारसंघांवरील तिढा सुटलेला नाही. ठाकरे गट आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही यावर एकमत होऊ शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पेच सोडवण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतील उर्वरित जागांवर जागावाटप सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु मराठी भाषिक बहुल भाग असलेल्या या तीन मतदारसंघांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद कायम आहे.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप

