Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात, आतापर्यंतच्या सुनावणीत काय-काय घडलं?
१९९५ च्या सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. कोकाटेंनी बनावट रेशनकार्ड तयार केल्याचा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचा आरोप आहे, तर कोकाटेंच्या वकिलांनी फसवणुकीच्या कलमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयात आर्थिक परिस्थिती आणि कागदपत्रांबाबत दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू आहे. कोकाटे यांची मुलगीही उपस्थित आहे.
१९९५ च्या सदनिका वाटप घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेल्या माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर कोकाटेंचे ज्येष्ठ वकील रवींद्र कदम युक्तिवाद करत आहेत. कोकाटेंनी बनावट रेशनकार्ड तयार करून आर्थिक दुर्बळ घटकांसाठी असलेल्या सदनिका मिळवल्याचा आरोप हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करू शकला, असे त्यांचे म्हणणे आहे.
यावर ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी कलम ४६३ (फसवणूक) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का?” असा युक्तिवाद केला. वार्षिक उत्पन्न १९८९ ते १९९४ पर्यंत विचारात घेतले नाही, असा मुद्दाही त्यांनी मांडला. कोर्टाने अद्याप अंतरिम आदेश दिलेला नाही. नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने आणि सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. कोकाटे यांची मुलगीही या सुनावणीदरम्यान कोर्टरुममध्ये उपस्थित आहे.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक

