माणिकराव कोकाटे
माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत. या आधी ते कृषी मंत्री होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा गट) नेते आहेत. नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत. त्यांनी 2019मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली होती. अनेक वादग्रस्त विधानांमुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत. राज्यातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद जाणार, मग धनंजय मुंडेंसारखी आमदारकी तरी वाचणार का? वाचा काय काय होणार?
Manikrao Kokate News : राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यानंतर आता त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 17, 2025
- 3:59 pm
धनंजय मुंडे पुन्हा मंत्री? थेट दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे प्रकरणानंतर मोठ्या घडामोडी; काय घडतंय?
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. असे असतानाच आता धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 17, 2025
- 3:43 pm
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना आणखी एक मोठा दणका, आता हॉस्पिटलमधून थेट जेलमध्ये? अडचणी वाढल्या
एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे, या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 17, 2025
- 3:52 pm
Manikrao Kokate : इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
मंत्री माणिकराव कोकाटे यांना १९९५ सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. अकराव्या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस त्यांच्या शोधात असून, न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 17, 2025
- 3:32 pm
Manikrao Kokate : अटक वॉरंटनंतरही माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद वाचणार? सर्वात मोठी बातमी समोर
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात एका प्रकरणामध्ये नाशिक सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता कोकाटे यांच्या मंत्रिपदावर सध्या टांगती तलवार आहे. यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 17, 2025
- 2:53 pm
कोकाटे यांचे मंत्रिपद जाणारच, थेट कायद्यातील तरतूद समोर; सरोदेंनी सगळं सांगितलं!
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. असे असतानाच आता कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 17, 2025
- 2:35 pm
Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने अटकेचे स्पष्ट आदेश दिले असून, यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 17, 2025
- 2:32 pm
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश; कोकाटे मात्र रुग्णालयात, आता पुढे काय होणार?
Manikrao Kokate Arrest Warrant: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे आदेश निघाले आहेत. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये अजून एका मंत्र्यांची विकेट पडल्याचे समोर आले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 17, 2025
- 2:44 pm
4 फ्लॅट, बनावट कागदपत्रे अन् सरकारी कोटा; माणिकराव कोकाटे ज्या प्रकरणात अडकले ते प्रकरण नेमकं काय?
अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने ३० वर्षांपूर्वीच्या गृहनिर्माण गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षांचा कारावास सुनावला आहे. मुख्यमंत्री गृहनिर्माण योजनेतील चार फ्लॅट गैरमार्गाने मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
- Namrata Patil
- Updated on: Dec 17, 2025
- 1:28 pm
Manikrao Kokate: माणिकराव कोकोटे यांना कोणत्याही क्षणी अटक? कारण तरी काय?
Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यामुळे कोकाटे यांच्याविरोधात आज दिवसभरात अटक वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 17, 2025
- 1:24 pm