Manikrao Kokate Hearing Update : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
नाशिकमधील सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने त्यांची अटक टाळत एक लाखाच्या जामिनावर मुक्त केले आहे. मात्र, त्यांची २ वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांना तुर्तास तुरुंगात जावे लागणार नाही.
नाशिकमधील १९९५ च्या सदनिका वाटप घोटाळा प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगिती याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा देत त्यांची अटक टळली असल्याचे जाहीर केले. त्यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे कोकाटे यांना तात्काळ तुरुंगात जावे लागणार नाही. तथापि, न्यायालयाने कोकाटे यांची २ वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. शिक्षेला स्थगिती न मिळाल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. विधिमंडळाकडून लवकरच यासंदर्भात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत युक्तिवाद केला होता, तर नाशिक पोलीस पथक कोकाटे दाखल असलेल्या लीलावती रुग्णालयात उपस्थित होते. कोर्टाच्या या निर्णयामुळे कोकाटे यांची तात्पुरती जेलवारी टळली असली तरी, राजकीय भवितव्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

