AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Local Body Election LIVE Updates : अमरावतीत मतमेट्या हलवताना वाद

| Edited By: | Updated on: Jan 13, 2026 | 8:28 AM
Share

Maharashtra Nagar Parishad and Panchayat Election 2025 Voting Live Updates in Marathi : नाशिक चांदवड नगरपालिकेची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. पाच टेबलांवर दोन फेऱ्यांत दहा प्रभागांची होणार मतमोजणी. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त. मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने आता उमेदवारांना भरणार धडकी.

Maharashtra Local Body Election LIVE Updates : अमरावतीत मतमेट्या हलवताना वाद
Maharashtra Local Body Election

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात घोळ बघायला मिळाला. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होता. मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर 21 डिसेंबरपर्यंत निकाल राखीव ठेवण्यात आली. आता आता 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडेल. अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Dec 2025 08:08 AM (IST)

    भाजप यादीवर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब

    भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूक साठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली.शंभरहून अधिक नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.मुख्यमंत्री फडणवीस या यादीतील नावांना मान्यता देऊन आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात बुधवारी झालेल्या भाजपच्या कोर कमिटी बैठकीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन भाजपचे प्रमुख पदाधिकारी काल मुंबईला गेले होते. अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • 20 Dec 2025 09:56 PM (IST)

    अमरावतीत मतमेट्या हलवताना वाद

    अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ शाळेतील मतदान केंद्रावरील मतपेटी हलवताना वाद झाला आहे. मतपेट्या सिलिंगच्या वेळी आमच्या पक्षाचा उमेदवार का नाही यातून हा वाद झाला आहे.तसेच मतपेट्या क्रुझर वाहनातूनच का नेण्यात येत आहेत असाही मुद्दा उपस्थित केल्याची माहिती आहे.

  • 20 Dec 2025 09:34 PM (IST)

    21 डिसेंबर पासून हनुमंत कथा महोत्सवाचे आयोजन

    गोंदिया : राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावतीने 21 डिसेंबर पासून हनुमंत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे वाचन वृंदावन सिद्धपीठाचे सदगुरू ऋतेश्वर महाराज यांच्या वाणीतुन होणार आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले आहे.

  • 20 Dec 2025 09:16 PM (IST)

    पैशांचा की निष्ठेचा गुलाल ऊधळला जाणार आहे हे थोड्याच वेळेत कळेल – पेडणेकर

    काही वेळात निकाल लागतील समजेल पैशांचा गुलाल की निष्ठेचा गुलाल ऊधळला जाणार आहे असे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. सत्तेतून पैसा , पैशांतून सत्ता हेच घडतंय असेही त्या म्हणाल्या. ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काम केलं, त्यांच्यावर आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाहीत. सगळे ऊघडे पडताना दिसत आहेत. जनतेला वाटलेला पैसा घरातून आणून वाटलेला नाही असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

  • 20 Dec 2025 09:01 PM (IST)

    अनगर नगरपंचायतील बिनविरोध विजयाची घोषणा उद्या, निवडणूक आयोगाची मान्यता

    सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतील बिनविरोध विजयाची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकऱ्यांना पत्र दिले आहे.अनगर नगरपंचायत निवडणुकीतील सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध विजय जाहीर करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. उद्या सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक हे अधिकृत घोषणा करणार आहेत. तसेच सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी हे विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करणार आहेत. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतमध्ये सर्व 17प्रभाग आणि नगराध्यक्ष पदावर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटील उमेदवार होत्या.

  • 20 Dec 2025 08:45 PM (IST)

    खानदेशात राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळेल, आमदार अनिल पाटील यांचा दावा

    धुळे नगरपालिका निवडणुकांच्या निकालात खानदेशात राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालात धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात पाच ते सहा नगराध्यक्षासह सव्वाशे नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

  • 20 Dec 2025 08:37 PM (IST)

    जालनात महायुतीचाच महापौर – बावनकुळे

    आज आम्ही जालन्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आलेलो असून भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर होईल जनता आमच्या सोबत आहे असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. विकसित जालन्याचा सरकार विचार करणार असल्यामुळे जालन्यातील जनता आमच्या सोबत आहे.आपले डबल इंजिन सरकारच नगरपालिकेला विकास निधी देऊ शकते असेही ते म्हणाले.

  • 20 Dec 2025 08:24 PM (IST)

    पुणे : राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ला

    पुण्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात 35 पर्यटक जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमींवर वेल्हे बुद्रुक येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात तसेच नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी पर्यटकांमध्ये पुणे, मुंबई, कराडच्या पर्यटकांचा समावेश आहे.

  • 20 Dec 2025 08:20 PM (IST)

    भिवंडी : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठीचे आंदोलन स्थगित

    नवी मुंबई विमानतळास स्व.लोकनेते दि बा पाटील याने नाव देण्याच्या मागणीसाठी 22 डिसेंबर रोजी भिवंडी मानकोली ते नवी मुंबई पर्यंत आयोजित पदयात्रा आंदोलन करण्यात येणार होते, मात्र आता ते स्थगित करण्यात आळे आहे. खासदार सुरेश म्हात्रे यांनी ही माहिती दिली आहे.

  • 20 Dec 2025 07:55 PM (IST)

    नांदेड : सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरू – खासदार चव्हाण

    नांदेडचे खासदार खासदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, भाजपने काही मतदारांना मंगल कार्यालयात डाबून ठेवल्याचे व्हिडिओ संपूर्ण मीडियात दाखवला. सत्ताधारी मंडळींकडून सत्तेचा पुरेपूर गैरवापर होत आहे. अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर होत आहे. लोकशाहीला घातक प्रक्रिया सत्ताधारी मंडळी राबवत आहेत.

  • 20 Dec 2025 07:42 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांना आणखी धक्के देणार

    पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासह सर्वच पक्षांना धक्का देत भाजपने अनेक प्रमुख नेत्यांचे प्रवेश पक्षात करून घेतले. भाजप मधल्या इनकमिंगची ही सुरुवात असून अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये येणार असल्याचं आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

  • 20 Dec 2025 07:27 PM (IST)

    सिंधुदुर्गात चारही ठिकाणी महायुतीचा विजय होणार – नितेश राणे

    भाजप नेते नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या चारही ठिकाणी महायुतीच्या विचारांचाच नगराध्यक्ष आणि पॅनल निवडून येईल असं विधान केले आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, निवडणुकीत युती करावी की नाही हा निर्णय वरीष्ठ पक्षश्रेष्ठी पातळीवर झाला. कार्यकर्ते म्हणून आम्ही निवडणुक लढवली. मी निवडणुकीच्या प्रचारात आधीही म्हटले की निकालानंतर आम्ही महायुती म्हणून एकत्र येणार. पहिल्या दिवसापासून हे स्पष्ट होते की निवडणूक वेगळे लढलो तरी सत्ता समीकरण हे महायुतीचेच असेल. कारभार महायुती म्हणूनच करणार. कारण राज्यात कौल महायुतीलाच मिळाला आहे.

  • 20 Dec 2025 07:15 PM (IST)

    हिंगोली : मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा, 8 वाजेपर्यंत मतदान चालण्याची शक्यता

    हिंगोलीतील वसमत नगरपालिकेसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली होती. सायंकाळचे साडेसहा वाजले तरी शहरातील बुधवारा जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. आता 8 वाजेपर्यंत मतदान चालण्याची शक्यता आहे.

  • 20 Dec 2025 06:55 PM (IST)

    अहिल्यानगर कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

    भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. अहिल्यानगर कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. भाजपाला पराभव दिसत असल्याने चुकीचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप करण्यात आला. तर भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांना लोकं सापडत नाहीत आणि असे आरोप करत असल्याची टीका केली आहे.

  • 20 Dec 2025 06:46 PM (IST)

    यवतमाळमध्ये उमेदवारांच्या दोन गटात राडा

    यवतमाळच्या अंजुमन इंग्लीश स्कूल मतदान केंद्रावर राडा झाला आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्रावर हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवली. काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.

  • 20 Dec 2025 06:39 PM (IST)

    काही लोक निवडणूक हारतात तर असले आरोप करतात, बावनकुळेंची प्रतिक्रिया

    काही लोक निवडणूक हरतात तर असले आरोप करतात, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.  नांदेड भाजप कडून मतदारांना कोंडून ठेवण्याच्या आरोपावर बावनकुळे यांनी परभणीत प्रतिक्रिया दिली. कधी मशीन खराब म्हणून मतदानाला जाऊ दिलं नाही असे आरोप करतात. जर आरोप सत्य असतील तर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस त्याची खबर घेतील, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • 20 Dec 2025 06:34 PM (IST)

    नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना तीन तास डांबून ठेवलं?

    नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना तीन तास डांबून ठेवल्याचं घटना समोर आलं आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पैशांचं आमिष दाखवून बोलवल्याचं मतदारांनी सांगितलं. यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती. आमदार राजेश पवार यांनी हे आरोप फेटाळले.  तर निवडणूक आयोगाने घेतली घटनेची गंभीर दखल.

  • 20 Dec 2025 06:26 PM (IST)

    नाशिक सिन्नरमध्ये बोगस मतदाराला पकडलं

    नाशिकच्या सिन्नरमध्ये बोगस मतदार पकडला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. बनावट आधारकार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.

  • 20 Dec 2025 06:17 PM (IST)

    अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात

    अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला.  अपघातात जखमी झालेल्या आमदार संजय खोडके जखमी अमरावतीच्या रीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.  महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आज अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना फोरव्हिलर वाहनाने त्यांना धडक दिल्याची माहिती आहे. आमदार संजय खोडके यांच्या पायाला व मणक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रिम्स हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे.

  • 20 Dec 2025 06:06 PM (IST)

    बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांकडून कारवाई

    बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 174 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • 20 Dec 2025 05:57 PM (IST)

    घाटकोपरचे आमदार पराग शाह यांची रिक्षाचालकाला मारहाण

    वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकाला आमदार पराग शाह यांनी कानशि‍लात लगावली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 20 Dec 2025 05:46 PM (IST)

    पुण्यातल्या ऑपरेशन लोटसवरून भाजपाचे जुने पदाधिकारी नाराज

    पुणे शहर भाजपा कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पुण्यात आज विविध पक्षातल्या 22 पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. इनकमिंगमुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरेसेनाच्या अमोल देवळेकरांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

  • 20 Dec 2025 05:33 PM (IST)

    शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन

    माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्याच्या कोरेगावातील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 20 Dec 2025 05:30 PM (IST)

    अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट, सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांची मारहाण

    अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट, सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांची मारहाण

    अंबरनाथ कैलासनगर परिसरात मतदानासाठी गेलेल्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांकडून मारहाण

    कुटुंबासह मतदानासाठी गेले असता मुलगी मिळत नाही म्हणून मतदार केंद्रावर शोध घेत असताना केली मारहाण

    कर्मचाऱ्यांच्या आरोपानुसार मुलीलाही मारहाण केल्याची माहिती

  • 20 Dec 2025 05:06 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध

    आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात  जोडोमारो आंदोलन

    भारत पाकिस्तान युद्धाबाबत केलं होतं विधान

    पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाची माफी मागावी, अशी आंदोलकांची मागणी

  • 20 Dec 2025 04:49 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटाची हाय व्होल्टेज बैठक, सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित

    शिवसेनेची नंदनवन या ठिकाणी हाय व्होल्टेज बैठक

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते नंदनवन येथे उपस्थित

    वसंत स्मृती दादर या ठिकाणी भाजप सोबत झालेल्या बैठकीतले सर्व तपशील पक्षातील सर्वांना सांगण्यात येत आहेत

    भाजपसोबत झालेल्या बैठकीत फक्त सेनेचे तीन नेते होते उपस्थित

    एकमताने दीडशे जागांचा झालेल्या ठरावावर चर्चा

    जास्तीत जास्त जागा मिळववण्याचा शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न

  • 20 Dec 2025 04:24 PM (IST)

    कोपरगावमधील राड्यानंतर काळे – कोल्हेंमध्ये आरोप प्रत्यारोप

    कोपरगावमधील राड्यानंतर काळे – कोल्हेंमध्ये आरोप प्रत्यारोप

    राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्यात आरोप प्रत्यारोप

    ‘भाजपचे कार्यकर्ते रांगेत उभे राहून मतदारांवर प्रभाव टाकताय’

    ‘भाजपला पराभव दिसत असल्याने चुकीचे उद्योग सुरू’

    ‘जनता त्यांना मतदानातून योग्य ते उत्तर देईल’

    राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांची प्रतिक्रिया

  • 20 Dec 2025 04:16 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील तीन नगरपरिषदेच्या सहा जागांसाठी आतापर्यंत 49.47 टक्के मतदान

    नाशिकच्या सिन्नर, चांदवड आणि ओझर येथील तीन नगर परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. आतापर्यंत या तीन नगर परिषदेसाठी 49.47 टक्के मतदान झाले आहे.

    मतदानाची टक्केवारी

    – चांदवड:54.42 – ओझर: 45.5 – सिन्नर: 50.55

  • 20 Dec 2025 03:45 PM (IST)

    Nanded Local body Election LIVE Update: नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदान केंद्रावर प्रचंड राडा

    नांदेडच्या धर्माबादमध्ये प्रचंड राडा सुरु आहे. तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोगस मतदान केल्याच्या आरोपातुन एका महिला आणि पुरुषाला जोरदार मारहाण करण्यात आली. मतदान केंद्र बाहेर मोठा जमाव, पोलिसांनी केला सौम्य लाठीमार.

  • 20 Dec 2025 03:30 PM (IST)

    आदित्य ठाकरे पुण्यातील नागरिकांच्या भेटीसाठी

    आदित्य ठाकरे पुण्यातील लोकमान्य नगरमध्ये नागरिकांच्या भेटीसाठी गेले आहेत. या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. लोकमान्य नगर मधील घरांचा विषय आदित्य ठाकरे घेतला समजून. पुण्यातल्या या लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटला स्थानिकांनी विरोध केला आहे.

  • 20 Dec 2025 03:15 PM (IST)

    शिवसेना वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी मेळावा सुरू

    शिवसेना वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, राजेंद्र गावित, विलास तरे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर, वसंत चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.

  • 20 Dec 2025 02:59 PM (IST)

    शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी येत्या रविवारी, प्रशासन सज्ज

    शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी येत्या रविवारी 21 डिसेंबर रोजी होणार आहे त्या अनुषंगाने शिंदखेडा नगरपंचायत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सहा टेबलांवर सहा फेऱ्यात ही मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे.

  • 20 Dec 2025 02:58 PM (IST)

    मालेगावमध्ये भीषण अपघात, वाहनाने दिली विद्यार्थिनीला धडक

    मालेगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे  भरधाव वाहनाने एका शाळकरी विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली आहे. निसर्ग स्टॉप परिसरात भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेली मुलगी ही इयत्ता आठवीत शिकते. या अपघातात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.

  • 20 Dec 2025 02:40 PM (IST)

    आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यकर्त्याकडून दमदाटी

    बबनराव अवताडे गटाचे ग्रामपंचायत सदस्य अण्णा आसबे यांना दमदाटी. आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यकर्त्याकडून झाली दमदाटी. मंगळवेढाया तीर्थक्षेत्र आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेस सुरु आहे. मंगळवेढयाच्या संत दामाजी चौकात झाली बाचा बाची. भाजपकडून सुप्रिया जगताप तर तीर्थक्षेत्र आघाडी कडून सुनंदा अवताडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • 20 Dec 2025 02:28 PM (IST)

    Ambernath Local Body Election LIVE Updates : शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

    अंबरनाथ मधील कोहचगाव परिसरात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदारांना मत टाकू देत नाही म्हणून आरोप-प्रत्यारोप. यावरून शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्ते आले आमने सामने. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झाला राडा.

  • 20 Dec 2025 02:23 PM (IST)

    वर्ल्ड कपसाठी भारताच्या टी 20 संघाची घोषणा, शुबमन गिलला वगळलं

    टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रिंकु सिंह, इशान किशन (विकेटकीपर).

  • 20 Dec 2025 02:10 PM (IST)

    Mangalwedha Local Body Election LIVE Updates : नगराध्यक्ष पद निवडणूक, उमेदवाराकडून 6000 रुपये मताला

    मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही पक्षांकडून हजार रुपये मताला वाटप सुरू आहे. तर प्राध्यापक असणाऱ्या उमेदवाराने 6000 रुपये मताला दिले आहेत. मटका वाले दोन नंबर वाले 4000 रुपये 5000 रुपये प्रमाणे मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवत आहेत. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलाय.

  • 20 Dec 2025 01:56 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बोलण्यासारख काहीच नाही – एकनाथ शिंदे

    पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बोलण्यासारख काहीच नाही. काहींच्या वक्तव्यामधून त्यांना असलेली पोटदुखी, जळजळ दिसतेय. पंतप्रधानांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न. पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 20 Dec 2025 01:36 PM (IST)

    Buldhana Local Body Election LIVE Updates : बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक मतदान

    सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत देऊळगाव राजा 11.69 %, जळगाव जामोद 14.78 %, खामगाव – 13.51 %, शेगाव 17.89 % मतदान झालं आहे.

  • 20 Dec 2025 01:25 PM (IST)

    Pune Local Body Election LIVE Updates : पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला दे धक्का

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला दे धक्का. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उप महापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उल्हास बागुल यांच्यासह बागुल कुटुंबीय तसेच पुणे महापालिकेतले माजी लोकप्रतिनिधी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश. पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदेंची रणनिती.

  • 20 Dec 2025 01:17 PM (IST)

    Washim Local Body Election LIVE Updates : भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादविवाद

    वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार सतीश वानखेडे आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रवीण इढोळे यांच्यात रात्री वाद झाला. त्यानंतर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादविवाद झाला. या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ गल्ला वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र भाजपचे आमदार शाम खोडे यांनी आरोपी सतीश वानखेडे याला गाडीच्या बाहेर ओढल्यानं आमदार श्याम खोडे पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

  • 20 Dec 2025 01:09 PM (IST)

    Nanded Local Body Election LIVE Updates : धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत

    धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत. प्रसादाच्या स्वरूपात चार हजार रुपये मिळणार असल्याचा महिलांचा आरोप. कप बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून थांबून ठेवण्याचा महिलांचा आरोप.

  • 20 Dec 2025 12:58 PM (IST)

    Ambernath Local Body Election LIVE Updates: अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

    भाजप कडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेने कडून करण्यात आला.त्यामुळे या परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठी चार्ज केला आहे.मात्र घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

  • 20 Dec 2025 12:50 PM (IST)

    Washim Local Body Election LIVE Updates: प्रभाग 7 मधील ईव्हीएम मशीन अर्धा तासांपासून बंद,मतदान ठप्प

    वाशिम नगर परिषद निवडणुकी करिता आज सकाळपासून सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक 7 मधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन गेल्या अर्ध्या तासांपासून बंद पडली असल्याने मतदान ठप्प झाले त्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली असून मतदारांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

  • 20 Dec 2025 12:40 PM (IST)

    Jalgoan Local Body Election LIVE Updates: भुसावळ मध्ये पोलीस आणि उमेदवारामध्ये शाब्दिक बाचाबाची

    भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार भावना अजय पाटील यांनी केंद्रावर आत मध्ये न न जाऊ दिल्यामुळे शाब्दिक चकमक झाली.उमेदवार भावना पाटील यांनी मोठ्या आवाजात पोलिसांना जाब विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनीही उमेदवार भावना पाटील व त्यांचे पती अजय पाटील यांना खडेबोल सुनावले. उमेदवाराकडून थेट पोलिसांवरच आक्षेप घेतला जात असल्याने पोलिसांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना गोंधळ न घालण्याच्या सूचना दिल्या.

  • 20 Dec 2025 12:30 PM (IST)

    Ahilyanagar Local Body Election LIVE Updates: 6.96 टक्के मतदान झाले

    अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांसाठी सकाळी 9:30 वाजेपर्यंत 6.96 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात थंडी असल्याने मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी होता 7.3 अंश पारा आहे. जिल्ह्यातील संपूर्ण 4 नगरपरिषदेसाठी आणि इतर नगरपरिषदेतील काही प्रभागासाठी मतदान होत आहे.

  • 20 Dec 2025 12:20 PM (IST)

    Ambernath Local Body Election LIVE Updates: संशयीत मतदारप्रकरणात आरोप फेटाळले

    अंबरनाथ 208 संशय मतदार प्रकरणात भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे यांच्या आरोपानंतर शिवसेना उमेदवार करुणा कृष्णा रसाळ पाटील यांचे पती कृष्णा रसाळ पाटील यांनी आपल्यावर लागलेल्या आरोप फेटाळले.आमचा कृष्णा मॅरेज हॉल असून या ठिकाणी लग्न त्यादिवशी होते. काँग्रेस भाजप आमच्या हॉलची बदनामी करणाऱ्या वरती कायदेशीर नोटीस पाठवणार असलयाचे ते म्हणाले.

  • 20 Dec 2025 12:10 PM (IST)

    Chandwad Election 2025 LIVE Updates: एका जागेसाठी मतदान सुरू

    चांदवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका जागेसाठी मतदान सुरूआहे.पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन मतदान केंद्रांवर 2060 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.तर परभणीत जिल्ह्यातील पूर्णा येथे मतदानाची टक्केवारी 7:30 ते 9:30 वाजेदरम्यान 8.59 टक्के होती.

  • 20 Dec 2025 12:00 PM (IST)

    नाशिकमध्ये भाजपने 24 तासात बदलला आपला निर्णय

    नाशिकमध्ये भाजपने 24 तासात आपला निर्णय बदलला. राहुल ढिकले यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली.राहुल ढिकले यांना हटवून आमदार देवयानी फरांदे यांना जबाबदारी दिली होती.निवडणुकीच्या काळात सुरू झालेल्या उलट सुलट चर्चेनंतर पुन्हा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय घेतला.नाशिक महापालिकेची जबाबदारी आता पुन्हा आमदार राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांच्यावर आली आहे. अवघ्या 24 तासात निर्णय बदलण्याची भाजप वरिष्ठांवर नामुष्की आली आहे.

  • 20 Dec 2025 11:50 AM (IST)

    ठाण्यात भाजपकडून शिवसेनेकडे १३१ पैकी ४८ जागांची मागणी

    भाजपकडून शिवसेनेकडे १३१ पैकी ४८ जागांची मागणी, उर्वरीत जागा शिवसेनेला, यात अनेक जागा शिवसेनेच्या उमेदवारांच्या देखील आहेत . मात्र शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नाही, सिटिंग नगरसेवकांच्या जागा मागितल्याने शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी करण्यात आली आहे. भाजप कडून मागील काही निवडणूक निकालांचे दाखले, मात्र त्यामध्ये एकट्या भाजपचे नाही तर युती म्हणून शिवसेनेचे देखील मते असल्याचा शिवसेनेचा बैठकीत निर्वाळा देण्यात आला. सेना भाजप जागा वाटपात ठाणे शहरातील जागांचा मोठा तिढा, एकच ठिकाणी दोन्ही पक्षाची ताकद असल्याने एका पॅनल मध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार मिळून उभे राहण्याची शक्यता आहे.

  • 20 Dec 2025 11:40 AM (IST)

    भाजप प्रवेशासाठी संजोग वाघेरे मुंबईला रवाना,पिंपरीत उद्धव ठाकरेंना धक्का

    भाजपने उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिलाय. ठाकरेंनी मावळ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरवलेले आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंना भाजपने फोडलंय. आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता प्रवेश होईल. सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवकांचा,पदाधिकऱ्याचा प्रवेश होईल, थोड्याचं वेळात ही नावं सर्वांना समजतील. असा दावा वाघेरेंनी केलाय. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. त्यामुळं प्रभाग 21 मधील इच्छुकांमध्ये नाराजी उफाळू शकते.

  • 20 Dec 2025 11:30 AM (IST)

    Satara Election 2025 LIVE Updates : सातारा जिल्ह्यात किती मतदान?

    सातारा जिल्ह्यात सकळी 9.30 पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

    • फलटण 7.27 % मतदान झालं
    • महाबळेश्वर 6.08 % मतदान पारड पडलं.
    • कराड 5. 2% इतकी मतदानाची नोंद झाली.
    • मलकापूर 1.66 % मतदान झालं.
  • 20 Dec 2025 11:30 AM (IST)

    Beed Election 2025 LIVE Updates:बीड आणि गेवराई मतदान प्रक्रिया दरम्यान गोंधळ घालणाऱ्या 55 जणांवर हद्दपारीची कारवाई

    बीडसह एकूण सहा ठिकाणी नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली होती. यादरम्यान बीड आणि गेवराई दोन्ही ठिकाणी मोठा राडा झाला होता. दगडफेक, मारहाण आणि गाड्यांची तोडफोड असे गंभीर प्रकार घडले होते. यादरम्यान दोन्ही ठिकाणच्या एकूण 55 लोकांना 48 तासांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आज उर्वरित नगरसेवक पदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडत असून उद्या मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता राहावी यासाठी बीड पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • 20 Dec 2025 11:25 AM (IST)

    Nanded Election 2025 LIVE Updates : नांदेडमध्ये हजारो मतदारांना कोंडून ठेवल्याचे उघड

    नांदेडच्या धर्माबादमध्ये हजारो मतदारांना कोंडून ठेवल्याची घटना उघड, पैशांचं आमिष दाखवून सकाळपासून बोलावून घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. – भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयात बोलून घेतल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

  • 20 Dec 2025 11:12 AM (IST)

    Yawatmal Election 2025 LIVE Updates : यवतमाळ नगर परिषदेसाठी किती झालं मतदान ?

    यवतमाळ नगर परिषदेसाठी मतदान पार पडत असून आज सकाळी 9.30 पर्यंत 7.57 % मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 20 Dec 2025 11:03 AM (IST)

    Nanded Election 2025 LIVE Updates : नांदेडमध्ये कडाक्याच्या थंडीचा मतदानावर परिणाम

    नांदेडमध्ये कडाक्याच्या थंडीचा नगरपालिका मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आलं.  पहिल्या दोन तासात केवळ 5. 41 टक्के मतदान झालं तर धर्माबाद नगरपालिकेसाठी 5.78 % आणि मुखेड नगरपालिकेसाठी 6.28 टक्के मतदान झालं.

    दरम्यान लोहा नगरपालिकेच्या एका जागे साठी 6.22 टक्के तर कुंडलवाडी नगरपालिकेच्या एका जागेसाठी साठी 3.91 टक्के मतदान आत्तापर्यंत झालं आहे.

  • 20 Dec 2025 10:57 AM (IST)

    Chandwad Election 2025 LIVE Updates : चांदवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका जागेसाठी मतदान सुरू

    चांदवड (नाशिक) –  चांदवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका जागेसाठी मतदान सुरू आहे. 5  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोन मतदान केंद्रांवर 2060 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

  • 20 Dec 2025 10:54 AM (IST)

    Ambernath Election 2025 LIVE Updates : अंबरनाथमध्ये आज मतदान; आरोपांच्या गदारोळातही एकही गुन्हा दाखल नाही

    अंबरनाथ नगरपरिषदेच्या ५९ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे.  मात्र निवडणुकीत पैसे वाटप, ईव्हीएम छेडछाड व बोगस मतदार आढळल्याचा आरोप भाजप व काँग्रेसने केले आहेत.

    पण एकही अधिकृत तक्रार प्राप्त न झाल्याने कुठलाच गुन्हा दाखल नाही अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

  • 20 Dec 2025 10:28 AM (IST)

    Satara Election 2025 LIVE Updates : फलटण नगरपालिका निवडणूकीत पुन्हा बंद पडलं EVM

    सातारा: फलटण नगरपालिका निवडणूक होत असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये पुन्हा एकदा EVM मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया थांबवली असून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

  • 20 Dec 2025 10:20 AM (IST)

    Fursungi Election 2025 LIVE Updates: तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक, राजकारणापलीकडची मैत्री

    एक प्रभाग, एक जागा आणि एकाच वर्गातील तीन मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोस्तीत कुस्ती नाय म्हणत हे तिघेही खेळीमेळीत रिंगणात उतरले आहेत. भाजप कडून विराज करचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गिरीष ढोरे, उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी तीन मित्रांची नाव आहेत. एक वकील, दुसरा इंजिनिअर आणि तिसरा उद्योजक आहे. तिघांची मैत्री राजकारणापलीकडची आहे. फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. प्रभाग १ मधून तिघेही उमेदवार आहेत.

  • 20 Dec 2025 10:14 AM (IST)

    वाशिम नगरपरिषदेमध्ये पहिल्या टप्प्यात 6.53 टक्के मतदान

    वाशिम नगरपरिषदेमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात साडे नऊ वाजेपर्यंत 6. 53 टक्के मतदान झाले तर रिसोड नगर परिषद मधील 2 प्रभागातील 2 उमेदवारांसाठी   8. 41 टक्के मतदान झाले आहे.

  • 20 Dec 2025 10:10 AM (IST)

    Ambernath Local Body Election LIVE Updates: 208 संशयित मतदार ताब्यात

    अंबरनाथ 208 संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संस्थेत मतदारांमध्ये लहान मुलं बुरख्याधारी महिला यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे समोर येत आहे.

  • 20 Dec 2025 10:01 AM (IST)

    शिवसैनिक पुण्यात नाराज

    शिवसेना (शिंदे) गटाला युतीमध्ये कमी जागा मिळणार असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र कार्यकर्ते नाराज आहेत त्याचबरोबर आहे.प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा अस माझं मत असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले. आम्ही 165 जागा लढायला तयार आहोत, तसा अहवाल शिंदेना पाठवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 20 Dec 2025 09:45 AM (IST)

    न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या 2 प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

    न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या 2 प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू झालीय. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर तुरळक मतदार पाहायला मिळतायेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात थंडीचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम मतदान केंद्रावर जाणवतोय. मोहोळमध्ये 11 ते 12 अंश सेल्सीयस तापमान असल्याने प्रचंड थंडी पडलीय. दुपारून मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढाच्या नगराध्यक्ष पदासह 31 जागा, मोहोळ नगरपरिषदच्या दोन प्रभाग, मैंदर्गी आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या एक प्रभागाच्या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतेय

  • 20 Dec 2025 09:26 AM (IST)

    अंबरनाथमध्ये २०० संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

    अंबरनाथ पोलिसांनी सुमारे २०० जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे परिसरातील इमारतीत ठेवले आहे. सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी सुरू आहे. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याची चौकशी सुरू आहे. भाजप व काँग्रेसकडून काल रात्री २०० बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप केला. भिवंडीवरून आलेले नागरिक कोसगाव परिसरातील सभागृहात आढळले आहेत.

  • 20 Dec 2025 09:15 AM (IST)

    ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात…

    ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार गजानन लवटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुलगा यश लवटे आणि संपूर्ण कुटुंब मतदानासाठी दाखल झाले आहेत.  अंजनगाव सुर्जीच्या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंजनगाव सुर्जी च्या निवडणुकीत आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • 20 Dec 2025 09:00 AM (IST)

    नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला

    उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठला आहे. तालुक्यातील रुई येथे 4.07 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.  या वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धूके पाहायला मिळत आहेत. थंडीचा शेती पिकांवर देखील परिणाम होत आहे.  द्राक्षासाठी अपायकारक तर गहू हरवण्यासाठी पोषक थंडी आहे…

  • 20 Dec 2025 08:45 AM (IST)

    भुसावळ सावदा वरणगाव,परिसरात मतदानाला सुरुवात

    भुसावळ सावदा वरणगाव,परिसरात मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकी एक दोन जागेसाठी मतदान होत आहे. थंडीच्या प्रमाणात प्रचंड वाढ असल्यामुळे मतदारांचा प्रतिसाद अल्प स्वरूपात प्रतिसाद दिसून येत आहे. केंद्रांवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसतोय.

  • 20 Dec 2025 08:34 AM (IST)

    अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगर परिषदेसाठी आज मतदान…

    नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्र 4/3 वर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड बिघाड झाल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीन सुरू झाल्याने पुन्हा एकदा मतदान सुरळीत सुरू झाले. अंजनगाव सुर्जी मध्ये आज नगरपरिषद मतदानाला साडेसात वाजता झाली सुरुवात..

  • 20 Dec 2025 08:30 AM (IST)

    फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीत नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठापनाला

    महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवाराच्या मध्ये महत्वपूर्ण लढत. महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनील शिंदे तर शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांचे मध्ये महत्त्वपूर्ण लढत. 20 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत.

  • 20 Dec 2025 08:20 AM (IST)

    फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकsसाठी आज मतदान प्रक्रिया

    फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत

  • 20 Dec 2025 08:10 AM (IST)

    सिन्नरच्या प्रभाग 2 च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडले

    बनावट आधार कार्ड बनवून आला होता मतदानाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला दिले पोलिसांच्या ताब्यात. भावाच्या जागेवर आलेल्या मतदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात. सिन्नर मध्ये आज होते आहे 3 जागांसाठी मतदान

  • 20 Dec 2025 07:55 AM (IST)

    अहिल्यानगरच्या पाथर्डी नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात

    सकाळी सात पासून कर्मचारी आणि उमेदवार मतदान केंद्रावर दाखल. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अभय आव्हाड आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून बंडू बोरुडे,.पाथर्डीत एकूण 10 प्रभागातून नगराध्यक्ष पदासह 21 जागेसाठी मतदान , 27 मतदान केंद्र, कर्मचारी 135मतदान केंद्रावर तैनात

  • 20 Dec 2025 07:50 AM (IST)

    अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगरपरिषद साठी आज मतदान

    दुसरीकडे कडाक्याची थंडी असल्याने मतदान केंद्रावर थंडीपासून बचाव करण्यासाठी कामगारांनी पेटवल्या शेकोट्या. मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात तापमानात घट..थंडीचा कडाका वाढला

  • 20 Dec 2025 07:40 AM (IST)

    ऊळगाव राजानगर परिषद साठी आज मतदान

    देऊळगावराजा नगर परिषदेसाठी आज मतदान होणार असून त्यापूर्वीची पूर्ण तयारी म्हणजेच मोकपॉल पूर्ण झाली आहे.. सर्व अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले असून त्यांनी प्रतिनिधींना बोलावून ई व्ही एम मशीन मोकपॉल करून दाखविली .. तसच थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होत आहे..

  • 20 Dec 2025 07:30 AM (IST)

    अंबरनाथमध्ये हजारोच्या संख्येने बोगस मतदार

    शिवसेना शिंदें गटाने हे सर्व बोगस मतदार आणण्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. एका पुढार्‍याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या, काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघड केला प्रकार. रात्रभर केला मंगल कार्य ल्याच्या बाहेर पहारा

  • 20 Dec 2025 07:25 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्हयातील 12 पैकी चार नगरपालिकांसाठी मतदान

    कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा तसेच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान. मतदान प्रकियेला सुरूवात , मात्र थंडीचा कडाका असल्याने मतदानासाठी अत्यल्प गर्दी. जिल्हयाचे तापमान 11 डिग्री सेल्सिययवर. नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला…. .

  • 20 Dec 2025 07:20 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या 9 जागांसाठी आज मतदान

    जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या जागांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार आज 20 रोजी मतदान होत आहे. त्यात वरणगाव येथील 10 11 अ आणि 12 ब, भुसावळ येथील 4 ब आणि 11 ब सावदा येथील 4 ब येथील 1 अ आणि यावल येथील 8 ब या जागांसाठी मतदान होईल. या जागांसाठी एकूण 44 मतदान केंद्रे आहेत, यात एकूण 33 हजार 664 मतदार आपला हक्क बजावतील.

  • 20 Dec 2025 07:10 AM (IST)

    अंबरनाथ नगरपालिका निवडणूक आज पार पडणार, 276 मतदान केंद्र हे सज्ज

    अंबरनाथ नगरपरिषद च्या 59 जागांसाठी आज मतदान होणार असून थेट नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे अंबरनाथ शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे सत्ता आहे यावेळी भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहेत.

  • 20 Dec 2025 07:05 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुर्जी नगरपरिषदेसाठी आज मतदान

    नगराध्यक्ष व 28 सदस्यांसाठी मतदान.नगराध्यक्ष पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 173 उमेदवार रिंगणात. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला. आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात. शहरात एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था. प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान कर्मचारी व महिला कर्मचारी नियुक्त.

  • 20 Dec 2025 07:05 AM (IST)

    सिन्नर, ओझर आणि चांदवड नगरपरिषदांच्या सहा जागांसाठी आज मतदान

    मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30पर्यंत. सिन्नर येथे 3, ओझर येथे 2 तर चांदवड येथे 1 जागेसाठी मतदान नाशिक जिल्ह्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची. सिन्नर नगरपरिषद निवडणूक माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपसमोर ठाकरे शिवसेनेकडून कडवे आव्हान. तिन्ही ठिकाणी मतदान प्रक्रियेला थोड्याच वेळात होणार सुरुवात. शांततेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज

  • 20 Dec 2025 07:04 AM (IST)

    फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदसाठी आज मतदान, लोकांमध्ये उत्साह

    नगराध्यक्षासह 32 नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार. पहिलीच नगरपरिषद निवडणूक असल्याने नागरिकांमध्ये उत्साह.

Published On - Dec 20,2025 7:03 AM

Follow us
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.