‘संयुक्त महाराष्ट्रा’साठी राष्ट्रवादीचा एल्गार; कर्नाटक सरकारविरोधात कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Nov 01, 2020 | 5:06 PM

बेळगाव सीमाप्रश्नावरुन राष्ट्रावादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे; या मागणीसाठी राष्ट्रवादीने आज (1 नोव्हेंबर) कर्नाटक सरकारविरोधात आक्रोश आंदोलन केलं.

संयुक्त महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादीचा एल्गार; कर्नाटक सरकारविरोधात कार्यकर्ते आक्रमक
Follow us on

मुंबई : बेळगाव सीमाप्रश्नावरुन राष्ट्रावादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे; या मागणीसाठी राष्ट्रवादीने आज (1 नोव्हेंबर) कर्नाटक सरकारविरोधात आक्रोश आंदोलन केलं. बेळगावसह सीमाभागात आज काळा दिवस पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हे आंदोलन आयोजित केलं. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (agitation of NCP in Mumbai on Belgaum issue  demanded Samyukta Maharashtra)

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे घाटकोपर येथील एलबीएस श्रेयस सिग्नलवर आज (1 नोव्हेंबर) आंदोलन करण्यात येणार होते. पण या आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीने आपल्या कार्यालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन आपला रोष व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी हा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी मागणी केली. तसेच, कर्नाटक सरकारविरोधातही जोरदार निदर्शनं केली.

दरम्यान, आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. बेळगावसह सीमाभागात आज काळा दिवस पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.

 

संबंधित बातम्या :

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध


(agitation of NCP in Mumbai on Belgaum issue  demanded Samyukta Maharashtra)