Aishwarya Rai | वाढदिवसनिमित्ताने ऐश्वर्या राय-बच्चनवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

| Updated on: Nov 02, 2020 | 6:05 PM

बॅालिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने 1 नोव्हेंबरला तिचा 47वा वाढदिवस साजरा केला आहे. ऐश्वर्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात आहे.

Aishwarya Rai | वाढदिवसनिमित्ताने ऐश्वर्या राय-बच्चनवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
Follow us on

मुंबई : बॅालिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने 1 नोव्हेंबरला तिचा 47वा वाढदिवस साजरा केला आहे. ऐश्वर्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात आहे. अभिनयातून तिने लोकांच्या हृदयातही विशेष स्थान मिळवले. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव तिच्यावर केला. ऐश्वर्याने तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला आहे. तिने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. (Aishwarya rai bachchan fans for birthday wishing)

या फोटोमध्ये ऐश्वर्या लेक आराध्यासोबत दिसत आहे. दोघीही या फोटोत अतिशय सुंदर दिसत आहेत. ऐश्वर्या व्हाईट आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आराध्याने फुलांच्या डिझाईनचा फ्रॉक घातला आहे. हा फोटो शेअर करत, ऐश्वर्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील प्रेम आराध्या, माझी परी,तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नाही. खूप खूप धन्यवाद आज मला दिवसभर सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. देवाची कृपा तुमच्या सर्वांवर असावी, हीच प्रार्थना…’

अभिषेकने दिल्या ऐश्वर्याला शुभेच्छा
ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चनने तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्यासोबत एक सुंदर फोटो शेअर करुन अभिषेकने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…तु जे आमच्यासाठी करते त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद…तु नेहमीच अशी हसत राहवी हीच प्रार्थना देवाकडे करतो, नेहमी खुश राहा…आम्ही तुझावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.’
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आणि ऐश्वर्या एकमेकांच्या खूप जवळ आहेत, त्याचे नातेही एक मुलगी आणि आई सारखेच आहे. एका अ‍ॅवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्या हिने रेखाला आई म्हणून संबोधले होते. जेव्हा रेखा ‘जज्बा’ या चित्रपटासाठी ऐश्वर्याला पुरस्कार देत होती, तेव्हा ऐश्वर्या म्हणाली होती की, हा पुरस्कार मला माझ्या आईकडून मिळाला आहे. यांच्यापेक्षा महत्वाचा क्षण माझ्या आयुष्यात दुसरा काय असू शकतो, हा माझ्यासाठी बहुमानच आहे. यावर रेखा उत्तर देताना म्हणाली की, अशा प्रकारचे पुरस्कार तुला जास्तीत जास्त मिळो आणि तेही माझ्या हातानेच मिळो.

संबंधित बातम्या : 

Abhishek Bachchan | वचन हे वचन असते, कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिषेक बच्चनचे ट्वीट

‘मिस वर्ल्ड’ आईची हुशार लेक, आराध्या बच्चनचं लक्षवेधी भाषण

(Aishwarya rai bachchan fans for birthday wishing)