‘वरिष्ठांचं ऐकावं लागतं’, डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

| Updated on: Sep 25, 2020 | 7:43 PM

आशिष शेलारांच्या आरोपांनंतर अजित पवारांना डिलीट केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण द्यावं लागलं (Ajit Pawar explanation on Deleted tweet).

वरिष्ठांचं ऐकावं लागतं, डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (25 सप्टेंबर) सकाळी ट्विटरवर आदरांजली वाहिली. मात्र, थोड्यावेळाने ते ट्विट त्यांनी डिलीट केलं. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे अजित पवारांनी ट्विट डिलीट केलं, असा आरोप आशिष शेलार यांनी केला (Ajit Pawar explanation on Deleted tweet).

आशिष शेलारांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी डिलीट केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “कोणत्याही निर्णयावर चर्चा होते. ज्या व्यक्ती आज हयात नाहीत, त्यांच्या संदर्भात आपण नेहमी चांगलंच बोलतो, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, तीच आपली परंपरा आहे. त्याचप्रमाणे मी ट्विट केलं होतं. पण शेवटी समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांच्यादेखील काही गोष्टी ऐकाव्या लागतात”, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं (Ajit Pawar explanation on Deleted tweet).

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

“पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी ट्विट केलं असेल तर त्यांचं ट्विट अतिशय योग्य आणि देशहिताचं होतं. त्यांनी ते ट्विट मागे घेतलं असेल तर ती घोडचूक आहे. त्यांना ती घोडचूक करावी यासाठी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील कुणी त्यांच्यावर दबाव आणला असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो”, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला होता. शेलारांच्या या टीकेनंतर अजित पवारांना डिलीट केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण द्यावं लागंल.

अजित पवार यांनी ट्विटरवर डिलीट केलेली पोस्ट

हेही वाचा :

बिहारमध्ये कोरोना संपला का?; राऊतांचा भाजपला सवाल

महाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप