माझं नर्सचं प्रशिक्षण, मी देशसेवेसाठी तयार, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला रायगडच्या रणरागिणीचा तात्काळ प्रतिसाद

| Updated on: Apr 08, 2020 | 5:12 PM

निवृत्त सिस्टर किंवा वॉर्डबॉय किंवा ज्यांना वैद्यकीय प्रशिक्षण घेऊनही सेवेत भरती होण्याची संधी मिळाली नाही, अशा प्रशिक्षित व्यक्तींनी या युद्धात सामील व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे (Alibaug Nurse Replies to CM Uddhav Thackeray appeal)

माझं नर्सचं प्रशिक्षण, मी देशसेवेसाठी तयार, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला रायगडच्या रणरागिणीचा तात्काळ प्रतिसाद
Follow us on

मुंबई : वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. माझं नर्सिंगचं प्रशिक्षण झालं आहे, असा तात्काळ प्रतिसाद देत रायगडच्या रणरागिणीने  नर्स म्हणून देशसेवा करण्याची तयारी दर्शवली आहे. (Alibaug Nurse Replies to CM Uddhav Thackeray appeal)

रायगड जिल्ह्यात अलिबाग मधील चोंढी तालुक्यात राहणाऱ्या शुभ्रा संदेश जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. ‘माझे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण झाले असून लग्नानंतर सध्या घरीच आहे. मुख्यमंत्र्यांनी देशसेवा करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार आपण अलिबाग तालुक्यात नर्स म्हणून काम करण्यास तयार आहोत’, अशा आशयाचा ईमेल त्यांनी पाठवला आहे. नर्सिंग सर्टिफिकेटही त्यांनी या मेलमध्ये जोडली आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं? 

निवृत्त सैनिक ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, अशा माजी अधिकाऱ्यांनी पुढे यावं तुमची महाराष्ट्राला गरज आहे. निवृत्त सिस्टर किंवा वॉर्डबॉय किंवा ज्यांना वैद्यकीय प्रशिक्षण घेऊनही सेवेत भरती होण्याची संधी मिळाली नाही, अशा प्रशिक्षित व्यक्तींनी या युद्धात सामील व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर आपला नाव, ठिकाण आणि संपर्क क्रमांक लिहून पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र या आयडीवर आपल्या सूचना, सल्ले किंवा तक्रारी लिहून मेल ब्लॉक करु नका, असंही त्यांनी बजावलं.

संबंधित बातम्या :

हृदयविकार, मधुमेह आणि स्थूलपणा, हायरिस्क रुग्णांना मुख्यमंत्र्यांचा मोलाचा सल्ला

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली ‘फिव्हर क्लिनिक’ संकल्पना नेमकी काय?

सिस्टर्स, वॉर्डबॉय आणि निवृत्त सैनिकांनो, योद्धे व्हा, देशाला तुमची गरज : मुख्यमंत्री

केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको : मुख्यमंत्री

(Alibaug Nurse Replies to CM Uddhav Thackeray appeal)