सगळ्या पक्षांना एकत्रित बसवून धार्मिक संघटनांशी बोलावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

| Updated on: Apr 19, 2022 | 12:59 PM

देशासमोर महागाई (Inflation), बेरोजगारी, सीमा सुरक्षा असे गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारने आणि भाजपने (BJP) त्यावर जास्त लक्ष द्यावे. मात्र, या सगळ्या गोष्टींवरून अन्यत्र लक्ष वळण्यासाठी अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भाजपवर केला.

Follow us on

काही घटकांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली जाते. मात्र, त्यांच्याकडून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले जाते, असा उल्लेखही त्यांनी केला. राज यांना मुंबई पोलिसांकडून जास्त सुरक्षा पुरवण्याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचे ते म्हणाले. सगळ्या पक्षांना एकत्रित बसवून त्यांच्याशी आणि धार्मिक संघटनांशी बोलावे, असे मला वैयक्तिक वाटते. मी माझ्या पद्धतीने जिथे अॅक्शन घ्यायला पाहिजे तिथे घेत असतो. राजकीय कोण, काय बोलत हे महत्त्वाचे नाही. आमच्या पक्षात प्रत्येक मंत्री आणि पदाधिकारी यांना जबाबदारी दिली जाते. माझ्याकडे नागपूर , गडचिरोली आहे. त्यानुसार पक्ष बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.