Harivansh Rai Bachchan | हरिवंश राय बच्चन यांचा सन्मान, ‘या’ देशातील चौकाचे नामकरण!

| Updated on: Oct 26, 2020 | 1:17 PM

पोलंड देशातील एका चौकाला अमिताभ यांचे वडील, प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचे नाव दिले जाणार आहे.

Harivansh Rai Bachchan | हरिवंश राय बच्चन यांचा सन्मान, ‘या’ देशातील चौकाचे नामकरण!
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सतत काहीना काही शेअर करून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. कधी ते आपल्या चित्रपटांचे किस्से सांगतात, तर कधी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील एखादी भावणारी गोष्ट! चाहत्यांनी केलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांची प्रशंसादेखील ते करतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट करत, चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. पोलंड देशातील एका चौकाला अमिताभ यांचे वडील, प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचे नाव दिले जाणार आहे. (Amitabh bachchan shares as the city of Wroclaw names a square after his father harivansh rai bachchan)

खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ‘पोलंडमधील व्रोक्लाव शहरातील एका चौकाचे नामकरण करण्यात येणार असून, बाबूजींचे नाव त्याला दिले जाणार आहे’, असे ट्विट करत त्यांनी सगळ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टनंतर अनेक बॉलिवूड सेलेब्सनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बिग बींच्या या पोस्टवर रणवीर सिंग, सुनील शेट्टी यांनी कमेंट केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Amitabh bachchan shares as the city of Wroclaw names a square after his father harivansh rai bachchan)

चाहत्यांचे कौतुक

नुकताच बिग बींनी एका लहान मुलाचचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये, तो लहान मुलगा त्याच्या आईच्या मांडीवर बसला आहे आणि बॅकग्राउंडला अमिताभ बच्चन यांचे ‘खैके पान बनारस वाला’ हे प्रसिद्ध गाणे वाजत आहे. बाळाला मांडीवर घेऊन बसलेली आई, त्याचा धरून त्याला या गाण्यावर नृत्य करायला शिकवत आहे. हा व्हिडीओ बिग बींना प्रचंड आवडला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

कोरोनावर मात करत महानायाकाचे पुनरागमन

काही काळापूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यासमवेत मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही या विषाणूची लागण झाली. सुमारे एक महिना त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर कोरोनाविरूद्धची लढाई जिंकत ते पुन्हा कामावर परतले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या 12व्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासमवेत अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात अमिताभ बच्चन झळकणार आहेत. याशिवाय प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या आगामी चित्रपटातही त्यांची एंट्री झाली आहे.

(Amitabh bachchan shares as the city of Wroclaw names a square after his father harivansh rai bachchan)