Photos: KBC च्या सेटवर 12 तास काम करतात बिग बी, पोस्ट शेअर करून सांगितलं कष्टाचं महत्त्व

  • Updated On - 9:48 am, Sun, 11 October 20
1/5
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. नेहमीच ते सोशल मीडियाद्वारे फोटो आणि व्हीडिओ शेअर करून  चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात. एवढंच नाही तर बऱ्याचदा ते त्यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कविताही सोशल मीडियावर शेअर करतात.

2/5
आता अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात कष्ट करणे किती महत्वाचं आहे हे चाहत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कष्ट केल्याशिवाय आयुष्यात काहीही मिळत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.  ते स्वत: किती कष्ट करतात हे सांगण्यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

3/5
77 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत ' At work.. KBC from 9 am to 9 pm .. and after that here at recording ..' असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच 'कष्ट केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही... वडील नेहमी म्हणायचे.. जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे' असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता वय सरलं असतानाही अमिताभ तब्बल 12 तास काम करत आहेत.  तरुणांसाठी हे नक्कीच प्रेरणा देणारं ठरतंय.

4/5
महानायक अमिताभ बच्चन सध्या मुंबईमध्ये केबीसीचं शुटींग करत आहेत.  केबीसीच्या या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

5/5
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी काळजी घेत केबीसीचं शुटींग सुरू आहे.

Published On - 8:00 am, Sun, 11 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI