AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : इराणने आपला सर्वोच्च नेता निवडला, नाव गुलदस्त्यात

| Edited By: | Updated on: Mar 08, 2026 | 10:43 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : इराणने आपला सर्वोच्च नेता निवडला, नाव गुलदस्त्यात
breaking

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभरात उत्साह पाहायला मिळत असून विविध सक्षमीकरण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित पिंक मॅरेथॉनला प्रसिद्ध समाजसेविका अमृता फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. तर मुंबईतील गोरेगाव आरे परिसरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने ८०० हून अधिक महिलांच्या सहभागासह भव्य महासाडी वॉकाथॉन पार पडत आहे. क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत अस्मिता आणि खेलो इंडिया अंतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असेल. या उड्डाणपुलामुळे चतु:श्रृंगी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मोठी सुटका होणार आहे. महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमधून जाणून घेण्यात येतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Mar 2026 06:46 PM (IST)

    इराणचे मिसाईल आणि ड्रोन संपले, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    इराणचे मिसाईल आणि ड्रोन संपलेले आहेत, असा दावा इराणने केला आहे. असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेकडून इराणच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यांवर हल्ले केले जात आहेत.

  • 08 Mar 2026 06:22 PM (IST)

    इराणने आपला सर्वोच्च नेता निवडला, नाव गुलदस्त्यात

    इराणने आपला सर्वोच्च नेता निवडला आहे. परंतु हा नेता नेमका कोण आहे? याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. नेता निवडीनंतर आता इराण पुन्हा एकदा युद्धात पूर्ण ताकदीने उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 08 Mar 2026 06:03 PM (IST)

    यूएईचा इराणवर थेट हल्ला, वॉटर प्लान्टचे मोठे नुकसान

    यूएईने इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या वॉटर प्लान्टवर यूएईने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यूएईच्या या हल्ल्यानंतर आता इराणही जशास तसे उत्तर देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात वॉटर प्लान्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

  • 08 Mar 2026 06:02 PM (IST)

    पेट्रोलचे पैसे न देता पिस्तूलचा धाक दाखवून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक

    पेट्रोलचे पैसे न देता पिस्तूलचा धाक दाखवून पळ काढणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक

    पेट्रोल पंपावरून पिस्तूल दाखवून पळ काढतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    सोलापूर धुळे महामार्गावरील वाशी फाट्यावरील पेट्रोल पंपावर मध्यरात्री घडली घटना

    दोन गुन्हेगारांच्या विरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    लखन शाहू मोहिते (रा. कळमनुरी, जि. हिंगोली, दिनेश भगवान चव्हाण (रा. आंबेजोगाई, जि. बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे

  • 08 Mar 2026 05:51 PM (IST)

    पेट्रोलचे पैसे न देता पिस्तूलाचा धाक दाखवून पळणारे अटकेत

    पेट्रोलचे पैसे न देता पिस्तूलाचा धाक दाखवून पळ काढणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांची पेट्रोल पंपावरून पिस्तूल दाखवून पळ काढतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सोलापूर धुळे महामार्गावरील वाशी फाट्यावरील पेट्रोल पंपावर ही घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणात दोन गुन्हेगारांविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून लखन शाहू मोहिते आणि दिनेश भगवान चव्हाण यांनी अटक झाली आहे.

  • 08 Mar 2026 05:50 PM (IST)

    चिपळूनमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

    चिपळूण शहरातील खेड परिसरात रंगपंचमीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. खेड येथील महालक्ष्मीची पालखी परिसरातून निघताच रंगोत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर तरुणाई एकमेकांवर रंग उधळत आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळते.

  • 08 Mar 2026 05:35 PM (IST)

    टी20 वर्ल्ड कप : भारत हिस्टरी रिपीट करणार, रीमा मल्होत्रा यांचा विश्वास

    अहमदाबादमध्ये पुन्हा तिरंगा फडकणार

    भारत हिस्टरी रिपीट करेल, रीमा मल्होत्रा यांचा विश्वास

    न्यूझीलंडवर विजयासाठी ‘टीम इंडिया’ने एकजुटीने खेळावे – रीमा मल्होत्रा

    ठाण्यातील स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केला विश्वास

    आज भारत न्यूझिलंडविरोधात उतरणार मैदानात

  • 08 Mar 2026 05:20 PM (IST)

    सिम्बायोसिस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात याव्यात – सुनेत्रा पवार

    अजित पवारांनंतर माझा प्रवास सोप्पा नव्हता, मात्र महिला शक्ती माझ्यामागे उभी राहिली आहे, हीच ताकद मला ऊर्जा देते, आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी त्या नेतृत्व करीत आहेत. आजपर्यंत सिम्बायोसिस ( Symbiosis ) मधून पाच हजारापेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत. सिम्बायोसिस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आली पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना त्याचा फायदा होईल असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे भाषण करताना म्हटले आहे.

  • 08 Mar 2026 05:15 PM (IST)

    पर्यटनासाठी सिंहगडावर केलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

    पर्यटनासाठी सिंहगडावर केलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

    मधमाशांच्या हल्ल्यामध्ये सात ते आठ जखमी

    जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

  • 08 Mar 2026 05:05 PM (IST)

    नागपूरात शिवकालीन शस्त्रास्रांचे प्रदर्शन

    नागपूरच्या नंदनवन सेवा समितीने महिला दिनाचे औचित्य साधत शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदनवन उद्यानात मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्रित होत महिला दिन साजरा केला आहे.

  • 08 Mar 2026 04:54 PM (IST)

    जागतिक महिला दिना निमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

    महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत जागतिक महिला दिना निम्मित गर्भाशय कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमचा शुभारंभ करण्यात आला. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील 9 लाख 84 हजार मुलींसाठी ही लसीकरण मोहीम असणार आहे . मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर मध्ये आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर, वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे आणि मुली आणि महिला उपस्थित होत्या.

  • 08 Mar 2026 04:40 PM (IST)

    अमरावती : ओव्हरटेक करताना एसटी बस खड्ड्यात कोसळली

    ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेल्याची घटना हिवरखेड – सोनाळा मार्गावर घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.

  • 08 Mar 2026 04:26 PM (IST)

    पुणे : वनव्यामुळे आंब्याच्या बागांमधील झाडे जळाली

    पुण्याच्या भोर तालुक्यातील गोकवडी गावाच्या परिसरातील डोंगरांगांना लागलेल्या वणव्यात, डोंगराशेजारील शेतकऱ्यांच्या बागेतील शेकडो आंब्याच्या झाडांचं नुकसान आहे. परिसरातील जवळपास 12 शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीचं माळरानावरील रानात प्रत्येकी 100 ते 150 अशी एकूण 1 हजार 200 च्या आसपास आंब्याची झाडे लावली होती. मात्र ही झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • 08 Mar 2026 04:12 PM (IST)

    वाशिम : पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

    पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग वाशिम यांच्या संयुक्तपणे हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकबुर्जी प्रकल्प येथे आपदा मित्र,आपदा सखी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्तीपूर्व तयारी आणि बचाव कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

  • 08 Mar 2026 03:57 PM (IST)

    मुंबई भाजप नगरसेवकांच्या 2 दिवसीय शिबिराला आजपासून सुरुवात

    मुंबई भाजप नगरसेवकांच्या दोन दिवसीय शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात हे शिबिर भरविण्यात आले आहे. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सकाळी मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केलं होतं. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतस्मृती कार्यालयाच्या सभागृहात दाखल होणार आहेत.

  • 08 Mar 2026 03:44 PM (IST)

    सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 ते 60 टक्के महिला निवडून येतात- फडणवीस

    “महिलांना 50 आरक्षण असल्यामुळे पुरुष सदस्य अल्पसंख्यांक झाले आहेत. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 ते 60 टक्के महिला निवडून येतात. आम्ही 25 महामंडळाकडून कर्ज घेतो आणि त्यांचं वाटप करतो, त्यामध्ये महिला 99% कर्ज परत करतात. पुरुष मात्र 50% च परतफेड करतात. एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे ध्येय आम्ही ठेवलं आहे. लाडक्या बहिणींच्या पैशातून आमच्या महिला उद्योजिका झाल्या आहेत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 08 Mar 2026 03:33 PM (IST)

    प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू महिलाच- देवेंद्र फडणवीस

    “2014 मध्ये भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती. आता ती चार नंबरवर आहे आणि मोदीजी तिला तीन नंबरवर आणतील, असा विश्वास आहे. बेटी पढाव बेटी बचाओ हा उपक्रम आता लखपती दीदीपर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू महिला आहेत. 2029 ला लोकसभेच्या निवडणुका होतील, त्या नवीन क्रांती आणतील. 33% महिला खासदार म्हणून निवडून येणार आहेत. 1992 ला मी नगरसेवक म्हणून निवडून आलो तेव्हा 90 टक्के महिलांचे पतीच काम करत होते. 1997 नंतर पाच वर्षात चित्र बदललं पन्नास ते साठ टक्के महिला निवडून आल्या आणि चित्र बदललं. महानगरपालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी आता 70 ते 80 टक्के महिलाच निवडून आलेल्या आहेत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 08 Mar 2026 03:22 PM (IST)

    इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्यांच्या निवडीबद्दल मोठा दावा

    इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्यांबद्दल चर्चा असतानाच मशहादचे इमाम अहमद अलामोलहोदा यांनी मोठा दावा केला आहे. इराणमध्ये देशाच्या पुढील सर्वोच्च नेत्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यासाठी मतदानसुद्धा पार पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. म्हणजेच आता फक्त जाहीर घोषणा होणं बाकी आहे.

  • 08 Mar 2026 03:11 PM (IST)

    आरोपांनंतर संदीपान भुमरे-अंबादास दानवे यांच्यात लग्नसमारंभात रंगल्या गप्पा

    छत्रपती संभाजीनगर- आरोप – प्रत्यारोपानंतर ठाकरेंच्या शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र आले आहेत. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यात लग्नसमारंभात गप्पा रंगल्याचं पहायला मिळालं. समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनातील मोबदला मिळवण्यासाठी बनावट हिबानामा केल्याचा दानवे यांनी खासदार भुमरे यांच्या चालकावर आरोप केला आहे. खासदार भुमरेंकडून अंबादास दानवे यांना एक कोटींची नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • 08 Mar 2026 02:55 PM (IST)

    महिला दिनानिमित्त सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण

    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत कार्यक्रम पार पडला आहे .जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिला सबलीकरण अंतर्गत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता, यामध्ये 15 हजार शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, यामधील यलो बेल्ट ग्रेड प्राविण्य मिळवलेल्या महिला व विद्यार्थिनींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं,यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह विविध शाळातील शिक्षक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या सांगली पॅटर्नचं कौतुक मंत्री चंद्रकांत पाटलांनी करत राज्यामध्ये,अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचा मानस देखील, यावेळी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे

  • 08 Mar 2026 02:45 PM (IST)

    जळगावात तापमानाचा पारा चाळीस अंशापर्यंत

    जळगावात तापमानाचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या कडाकामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाच्या चटक्यांमुळे लाही लाही होत असल्याचे चित्र आहे.

  • 08 Mar 2026 02:30 PM (IST)

    धुळ्यात शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फूठली

    धुळ्यात शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फूठली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील वर्षी फाट्याजवळ पाईपलाईनला मोठा लिकेज झाला आहे. लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महिन्याभरात दोन वेळेस पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी गेले वाया

  • 08 Mar 2026 02:15 PM (IST)

    जगात सर्वात सुरक्षित शहर मुंबई-पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे

    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात आज पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार आज महिला पोलिसांच्या हाती देण्यात आला. बीट मार्शल ड्युटी ऑफिसर अशा सर्वच जबाबदाऱ्या महिला पोलिसांच्या हाती देण्यात आल्या महिला कुठेही कमी नाहीत महिला पोलिसांमुळे संपूर्ण मुंबईत सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळत आहे. जगात सर्वात सुरक्षित शहर देखील मुंबईचा आहे आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही चौख पणे पार पाडू असा विश्वास महिला पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला

  • 08 Mar 2026 01:50 PM (IST)

    महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना

    महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिना–माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले. या घटनेत महिलांना मारहाणीत जखमा झाल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झालेत. माढा तालुक्यातील चिंचोली गावच्या परिसरात सिना–माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवरून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला.वादाचे रूपांतर मोठ्या मारहाणीत झाले. उपळाई गटाच्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी मोरे यांचे पती मुन्ना मोरे यांची गुंडगिरी आली समोर. मुन्ना मोरे सह बावी गावातील चौघांवर मारहाणीचा गुन्हा माढा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. तर मोरे यांच्या गटाकडूनही परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली आहे.

  • 08 Mar 2026 01:40 PM (IST)

    28 वर्षीय सराईत आरोपी शहाबाज उर्फ शंभू मुन्ना कुरेशीला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी!

    28 वर्षीय सराईत आरोपी शहाबाज उर्फ शंभू मुन्ना कुरेशीला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  तर बिष्णोई गँगचा संबंध नसून जुन्या वादातूनच २२ राऊंड फायर केल्याची पोलिसाची माहिती समोर येत आहे. पोलिस कोठडीत शस्त्रे कुठून आली? साथीदार कोण? याचा खुलासा होणार आहे. काल मुंब्र्यातील अलमास कॉलनीमध्ये आरोपी शहाबाज उर्फ शंभू मुन्ना कुरेशी याने व्यापारी नागरिक आणि पोलिसांवरती  गोळीबार केला होता.  गोळीबार मध्ये दोन नागरिक जखमी असून पोलिसांनी लाठी-काठीचा वापर करून आरोपीला  बेड्या ठोकल्या होत्या. आरोपीकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि चार मॅगझिन जप्त करत त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 08 Mar 2026 01:20 PM (IST)

    आज जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीत रचला गेला इतिहास…

    डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील तब्बल ९,१११ महिला आणि विद्यार्थीनींनी केलं सामूहिक लेझीम वादन , केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उपक्रम आयोजीत करण्यात आला. यापूर्वी सांगली येथे ७,३३८ महिलांनी केलेला विक्रम नोंदवला गेला होता. मात्र डोंबिवलीतील ९,१११ महिलांच्या सहभागामुळे हा विक्रम मोडला असल्याची घोषणा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी केली.

  • 08 Mar 2026 01:13 PM (IST)

    पुन्हा पुन्हा हेच सांगेन, जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन, की भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष होईल,असं विधान आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी केले आहे, काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉच ची भूमिका असल्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून सांगण्यात आलं होतं, आता जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा होईल, असं सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपण कोणत्याही प्रकारची विविध बाबत धमकी दिली नाही, मी फक्त कायदा समजून सांगितला, कायदा समजून सांगणं हे देखील आवडणार नसेल, तर तेही बंद करू, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला लगावला, ते सांगली मध्ये बोलत होते..

  • 08 Mar 2026 01:00 PM (IST)

    जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीत रचला गेला इतिहास

    डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील तब्बल ९,१११ महिला आणि विद्यार्थीनींनी सामूहिक लेझीम वादन करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उपक्रम आयोजीत करण्यात आला होता. यापूर्वी सांगली येथे ७,३३८ महिलांनी केलेला विक्रम नोंदवला गेला होता. मात्र डोंबिवलीतील ९,१११ महिलांच्या सहभागामुळे हा विक्रम मोडला असल्याची घोषणा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी केली.

  • 08 Mar 2026 12:50 PM (IST)

    एकाच बाईकवर सहा तरुण

    मुंब्र्यात वाहतूक नियम धाब्यावर बसवत एकाच बाईकवर सहा तरुण प्रवास करत होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकाच बाईकवर सहा तरुणांचा धोकादायक प्रवास दिसून आला. मुंब्रा अमृत नगरमधील स्टंटबाजीचा हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट दिसून आली.

  • 08 Mar 2026 12:41 PM (IST)

    पुन्हा पुन्हा हेच सांगेन,जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल

    मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन,की भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष होईल,असं विधान आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी केले आहे,काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉच ची भूमिका असल्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून सांगण्यात आलं होतं,आता जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा होईल, असं सांगितले आहे.तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपण कोणत्याही प्रकारची विविध बाबत धमकी दिली नाही,मी फक्त कायदा समजून सांगितला,कायदा समजून सांगणं हे देखील आवडणार नसेल,तर तेही बंद करू,असा टोला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला लगावला,ते सांगली मध्ये बोलत होते

  • 08 Mar 2026 12:30 PM (IST)

    श्री तुळजाभवानीला नैसर्गिक रंग लावत करण्यात आली रंगपंचमी साजरी

    श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज रंगपंचमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला पांढराशुभ्र शालू नेसविण्यात आला आणि त्यावर सप्तरंगांची उधळण करून रंगपंचमीचा धार्मिक सोहळा पार पडला. मंदिरातील महंत आणि पुजाऱ्यांनी देवीला रंग लावून पारंपरिक पद्धतीने पूजा केली. त्यानंतर पुजारी व भाविकांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद व्यक्त केला. या उत्सवात प्रामुख्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला. यावेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक अमोल भोसले, पुजारी तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रंगपंचमीच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

  • 08 Mar 2026 12:23 PM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी

    सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली. 1993 नंतर पहिल्यांदा मराठा समाजाला महापौरपदाची संधी आली होती. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना संधी दिली. आमची मागणी आहे की अडीच वर्षापैकी सभा वर्ष मराठा समाजाला महापौर पद द्यावे तसेच जिल्हा परिषदेत कुणबी मराठा समाजाला अध्यक्ष करावे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोलापूरसह राज्यभरात आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

  • 08 Mar 2026 12:11 PM (IST)

    दोन पोलिसांचे निलंबन

    दोन दिवसापूर्वी पंढरपूर मधील सांगोला चौकात वाहतूक पोलिसांनी ‘नो-एन्ट्री’ कारवाईदरम्यान ट्रक चालकाकडून २ हजार रुपये रोख घेतले होते. पावती न देता रक्कम घेतल्याची चालकांनी तक्रार केली होती. काही वेळातच मोबाईलवर १ हजार रुपयांचे ऑनलाईन चलन देण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

  • 08 Mar 2026 12:00 PM (IST)

    रामदास आठवले साईचरणी

    राज्यसभेत हॅट्रिकनंतर रामदास आठवले यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शिर्डीत साईचरणी नतमस्तक झाले. कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी दिल्या रंगपंचमीच्या खास शुभेच्छा दिल्या.

    माझ्या पक्षाचा निळा आहे रंग… मी त्यामध्येच आहे दंग… आज शिर्डीत उधळले जाणार आहेत अनेक रंग… पण त्यामुळे कुणाचेही होणार नाही स्वप्न भंग…

  • 08 Mar 2026 11:55 AM (IST)

    अमेरिकेनं युद्ध जवळजवळ जिंकलंय, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

    अमेरिकेनं युद्ध जवळजवळ जिंकलंय, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेला आता ब्रिटनच्या मदतीची गरज नाही. अमेरिका युद्ध जिंकत असताना आता इतर देशांकडून मदत नको.  ब्रिटनकडून 2 विमानवाहू जहाजं मध्य पूर्वेत पाठवण्याचा विचार. उशिरा घेतलेल्या निर्णयाचा दोन्ही देशांमधील विश्वासावर परिणाम- ट्रम्प

  • 08 Mar 2026 11:45 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षात रस्सीखेच

    पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षात रस्सीखेच… स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळणार…. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक मिळणार…

  • 08 Mar 2026 11:35 AM (IST)

    बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक लवकरच होणार

    बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक लवकरच होणार… मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता….

  • 08 Mar 2026 11:25 AM (IST)

    सर्व तेल कंपन्यांना एलपीजीचं उत्पादन वाढण्याचे आदेश

    केंद्र सरकारने एस्माचा वापर करत सर्व तेल कंपन्यांना एलपीजीचं उत्पादन वाढण्याचे आदेश…. युद्धाचा भडका आणखी वाढल्यास देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती…

  • 08 Mar 2026 11:11 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं उद्धाटन

    देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं उद्धाटन. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती.  उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

  • 08 Mar 2026 11:10 AM (IST)

    पश्चिम आशियातील भारताची शेतमाल निर्यात धोक्यात

    पश्चिम आशियातील भारताची शेतमाल निर्यात धोक्यात… सध्य़ा सुरू असलेल्या युद्धामुळे शिपिंग मार्गांना धोका.. तांदूळ, केळी यासारख्या उत्पादनांवर लक्षणीय परिणाम…

  • 08 Mar 2026 10:50 AM (IST)

    परभणीत दाखल होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

    भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांचं परभणीत स्वागत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच भव्य स्वागत. घरापर्यंत काढली रॅली. घरी पोहोचताच कुटुंबीयांनी केलं औक्षण. राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने रामराव वडकुते मित्र मंडळाच्या वतीने स्वागत.

  • 08 Mar 2026 10:40 AM (IST)

    मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

    आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी ब्लॉक जाहीर. ​मध्य रेल्वे: माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन जलद मार्ग) वेळ: सकाळी ११:२० ते दुपारी ३:४५. ​हार्बर रेल्वे: कुर्ला ते वाशी (अप आणि डाऊन मार्ग) | वेळ: सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१०. पश्चिम रेल्वे: देखभाल दुरुस्तीसाठी विशेष ब्लॉक.

  • 08 Mar 2026 10:30 AM (IST)

    नाशिकमध्ये आज साजरा होतो आहे रंगपंचमीचा उत्सव

    शहरात सार्वजनिक मंडळाकडून रंगपंचमीची जोरदार तयारी. नाशिकमध्ये पेशवे कालीन रहाडी मध्ये रंग खेळण्याची परंपरा. शहरात जवळपास आठ ठिकाणी राहाडी उघडल्या. वेगवेगळ्या नैसर्गिक रंगांनी रहाडीत पोहोचले जाणार पाणी. नाशिक मध्ये असलेल्या या परंपरेत सहभागी होण्यासाठी हजारो नाशिककर होणार सहभागी

  • 08 Mar 2026 10:20 AM (IST)

    विवाहितेची महिन्यात तीनदा विक्री ; जबरदस्तीने तीन लग्न, आत्महत्येचा प्रयत्न

    लालसेपोटी मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अवघ्या 21 वर्षाच्या विवाहित तरुणीची एका महिन्यात तीन ठिकाणी विक्री करून तिचे जबरदस्तीने तीन वेळा लग्न लावून देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे आणि तुळजापूर येथील एजंटांनी लाखो रुपयांचा व्यवहार करत तरुणीचा सौदा केल्याचा आरोप आहे. मानसिक छळ आणि या अमानुष प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • 08 Mar 2026 10:05 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर देवगाव रस्त्यावर मोटरसायकल खड्ड्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

    अस्वलि हर्ष येथे खोदून ठेवलेल्या खड्ड्यात रात्री मोटरसायकल पडून जागीच मृत्यू. सोनू मेरदे वय 30 असे असे तरुणाचे नाव. रस्त्याच्या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदून मोऱ्या बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र बांधकाम विभागाने व ठेकेदाराने दिशादर्शक फलक लावले नसल्याने वाहनचालकांना करावा लागतो त्रास सहन. ठेकेदार व बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा एल्गार कष्टकरी संघटनेचा आरोप. जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी

  • 08 Mar 2026 09:56 AM (IST)

    ठाणे रेल्वे स्थानकावर चोरांचा धुमाकूळ, पोलीस शिपायाचाच महागडा मोबाईल लांबवला

    ठाणे रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल लांबवणाऱ्या चोरांनी आता थेट पोलिसालाच लक्ष्य केले आहे. ठाणे स्थानकावर ड्युटी आटोपून घरी जाण्यासाठी पनवेल स्लो लोकलमध्ये चढत असताना एका पोलीस शिपायाचा महागडा मोबाईल चोरट्याने शिताफीने लंपास केला. गाडीत चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हा हातसाफ केला. या घटनेमुळे स्वतः पोलीस शिपायालाच मोठा धक्का बसला असून, याप्रप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (GRP) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस आता स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सराईत चोरट्याचा शोध घेत असून, या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • 08 Mar 2026 09:46 AM (IST)

    ठाण्यात ऑनलाईन सट्टा लावणारा अटकेत, खंडणी विरोधी पथकाची छापेमारी

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील हाय-व्होल्टेज सेमीफायनल सामन्यादरम्यान ऑनलाईन क्रिकेट बेटिंग चालवणाऱ्या एका अड्ड्यावर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. कोपरी पूर्व परिसरातून २६ वर्षीय विनीत मोरे नावाच्या तरुणाला पोलिसांनी राहत्या घरातून रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. हा तरुण ऑनलाईन माध्यमांतून सामन्यावर सट्टा लावत होता आणि बेटिंगची मोठी रक्कम बँक खात्यांद्वारे वळवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे ठाण्यातील सट्टेबाजांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • 08 Mar 2026 09:36 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा महोत्सवाचा उत्साह; रक्षा खडसे यांची विशेष उपस्थिती

    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्मिता आणि खेलो इंडिया अंतर्गत विशेष क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून महिला खेळाडूंचा उत्साह वाढवला. क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग केवळ वाढवणेच नव्हे, तर त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करणे आणि तंदुरुस्तीचा (Fitness) संदेश घराघरात पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी रक्षा खडसे यांनी महिलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमामुळे शहरातील क्रीडाप्रेमी महिला आणि विद्यार्थिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर चैतन्य पाहायला मिळाले.

  • 08 Mar 2026 09:26 AM (IST)

    नाशिकमध्ये लाच मागणाऱ्या जीएसटी अधिकाऱ्यांचा भांडाफोड, तिघांना अटक

    नाशिक: जीएसटी कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी आणि संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई टाळण्यासाठी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य कर विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक राज्य कर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि खाजगी व्यक्ती अमित हिरामण जाधव यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १.२५ कोटींची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती १ कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील २० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने ही कारवाई केली. आरोपींच्या घराच्या आणि कार्यालयाच्या झडतीमध्ये रोख रक्कम, बँक पासबुक आणि मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे नाशिकच्या प्रशासकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 08 Mar 2026 09:19 AM (IST)

    नाशिकमध्ये वाहतुकीचा बोजवारा, द्वारका परिसरात भुयारी मार्गाचे काम सुरू

    नाशिक शहरातील द्वारका परिसरात भुयारी मार्गाच्या (Subway) खोदकामाला सुरुवात झाल्याने नाशिककरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कावेरी हॉटेलपासून या कामाला सुरुवात झाल्यामुळे सारडा सर्कल ते द्वारका हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. परिणामी, काठे गल्ली, फेम सिग्नल आणि मुंबई नाका या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. प्रशासनाने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी, नियोजनाच्या अभावामुळे आणि अपुऱ्या ट्रॅफिक वॉर्डनमुळे दिवसभर वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत असून नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • 08 Mar 2026 09:15 AM (IST)

    नाशिक शिक्षक भरती घोटाळा: १५० शिक्षकांचे वेतन रोखले; २ हजार जण एसआयटीच्या रडारवर

    राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) पहिल्या अहवालात सुमारे १५० शिक्षकांची नावे निष्पन्न झाली असून, या संबंधित शिक्षकांचे वेतन तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या तपासाच्या कक्षेत अधिकारी, कर्मचारी आणि संस्थाचालकांसह सुमारे २ हजार जण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षक भरती केल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नाशिक विभागासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत.

  • 08 Mar 2026 09:08 AM (IST)

    नागपूरच्या उमरेड पेपरफुटी प्रकरणात गुरु-शिष्याचे कारस्थान उघड; १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले असून, यामध्ये ‘गुरु-शिष्याची केमिस्ट्री’ समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. सतीश मुकुंद खर्चे आणि त्याचा शिष्य अतुल जगन चौधरी यांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोघेही एकाच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते; अतुल तिथे तासिका तत्त्वावर काम करण्यासोबतच स्वतःचे कोचिंग क्लासेस चालवत असे. विशेष म्हणजे, प्रा. खर्चे यांची २०२३-२४ मध्ये बोर्डाचे पेपरसेटर म्हणून नियुक्ती झाली होती. तपासादरम्यान असे दिसून आले की, २०२३ आणि २०२६ चे पेपर जवळपास तंतोतंत जुळत होते, ज्याचा फायदा शिष्याच्या कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांना करून देण्यात आल्याचा संशय आहे. या गंभीर गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 08 Mar 2026 09:02 AM (IST)

    जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरात पिंक मॅरेथॉनचे आयोजन

    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ‘पिंक मॅरेथॉन’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या धावण्याच्या स्पर्धेला प्रसिद्ध समाजसेविका अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अमृता फडणवीस यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवी झेंडा दाखवून सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा पालिकेचा मानस असून, शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published On - Mar 08,2026 8:59 AM

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत