Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून राज्यातील काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून अखेरच्या क्षणापर्यंत समन्वयाचे प्रयत्न करण्यात आले, मात्र नाशिक आणि जळगाव या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिल्याने या ठिकाणी निवडणूक अटळ ठरली आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अर्ज माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांच्याशी संपर्क साधून माघारीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. गोकुळ गीते यांनीही “आम्ही पोहोचतोच” असे संकेत दिले होते. मात्र अखेरीस त्यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने आता नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यात थेट लढत होणार आहे.
दुसरीकडे जळगावमध्येही महायुतीसमोरील बंडखोरी कायम राहिली आहे. शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी माघार न घेतल्याने जळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार नंदकुमार महाजन आणि रेश्मा काळे यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे महायुतीला दोन्ही मतदारसंघांमध्ये अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील अनेक जागांवर बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास यश आले असले तरी नाशिक आणि जळगावमध्ये बंडखोरी शमलेली नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली असून आता या लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 04, 2026 05:11 PM
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने...