AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s T20 WC 2026 विजेत्या संघाला कोट्यवधींचं बक्षीस, उपविजेत्याला मिळणार इतकी रक्कम

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडिया पुन्हा आयसीसी टी20 वर्ल्डकपसाठी सज्ज झाली आहे. ही स्पर्धा 12 जून ते 5 जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. यावेळी बक्षिसी रक्कमही वाढवण्यात आली आहे.

Women’s T20 WC 2026 विजेत्या संघाला कोट्यवधींचं बक्षीस, उपविजेत्याला मिळणार इतकी रक्कम
Women’s T20 WC 2026 विजेत्या संघाला कोट्यवधींचं बक्षीस, उपविजेत्याला मिळणार इतकी रक्कमImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 04, 2026 | 10:01 PM
Share

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता काही दिवसात सुरूवात होणार आहे. इंग्लंडमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा 12 जून ते 5 जुलैदरम्यान होणार आहे. एकूण 12 संघ या स्पर्धेत भाग घेणार असून एकूण 33 सामने होणार आहे. सहा संघांचे दोन गट केले असून भारत आणइ पाकिस्तान एकाच गटात आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका भिडणार आहे. तर भारताचा पहिला सामना 14 जून रोजी असणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. असं असताना वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेची चर्चा होत आहे. वुमन्स टी20 वर्ल्डकप विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार ते जाणून घ्या.

आयसीसीने वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 87,64,615 यूएस डॉलर रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. मागच्या स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम 10 टक्क्यांनी जास्त आहे. भारतीय रूपयात ही रक्कम 81.4 कोटी होते. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत ही रक्कम 79,58,077 डॉलर होती. म्हणजेच यंदा ही रक्कम 8.06 लाख डॉलरने वाढली आहे. विजेत्या संघाल जवळपास 22 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. विजेत्या संघाला 23,40,00 डॉलर म्हणजेच 21.87 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. मागच्या विजेत्या न्यूझीलंड संघाला जवळपास 20 कोटी रुपये मिळाले होते. मेन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील विजेत्या संघाला 25 कोटी रुपये देण्यात आले.

उपविजेत्या संघाला 11,70,000 डॉलर म्हणजेच 10.9 कोटी रुपये मिळणार आहे. तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 6.75 लाख डॉलर म्हणजेच 6.30 कोटी मिळतील. तसेच साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी 29 लाख रुपये दिले जातील. या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला 247,500 डॉलर म्हणजेच अंदाजे 2.31 कोटी रुपये याची हमी दिली गेली आहे.

भारताचे वेळापत्रक

  • 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध
  • 17 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध
  • 21 जून विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • 25 जून रोजी बांगलादेशविरुद्ध
  • 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...